पालघर (वैभव पाटील :प्रतिनिधी): पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेची सदस्य नोंदणी दि. 16 एप्रिल ते दि. 08 मे 2022 पर्यंत करण्यात आली. सदर नोंदणी संदर्भात युवासेना पालघर जिल्हा विस्तारक आशिष पाटील यांनी पालघर, बोईसर तसेच डहाणू विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक बूथवर प्रत्यक्ष भेट देऊन नोंदणी कार्यक्रमाचा विशेष आढावा घेतला. तसेच ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना सामील करण्याच्या दृष्टीने सदर नोंदणी करण्यासंदर्भात पालघर जिल्ह्यातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या नोंदणी अभियानात जिल्ह्यातील 3500 तरुण-तरुणींनी नोंदणी करून अभियान यशस्वी केले. यावेळी युवासेनेचे पालघर जिल्हा प्रमुख राकेश पाटील व जश्विन घरत यांच्यासह अन्य कार्यकर्ते यांनी नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
Home Uncategorized पालघर जिल्हात युवासेनेला मिळणारणार बळकटी,युवासेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान संपन्न..