गणेश घाडगे: मुख्य कार्यकारी संपादक
जनता एक्सप्रेस मराठी न्यूज
सध्या सोशल मीडियावर भारतातील चित्रपट सृष्टीतील हिरो शाहरुख खान याचा फोटो व्हायरल होत आहे या व्हायरल फोटोत आपल्या मुलाबद्दल बापाची तळमळ काय असू शकते हे त्वरित लक्षात येते. पैसा आणि प्रसिद्धी, वलय म्हणजे सर्व नाही .आयुष्यात पुढे जाताना नीतिमूल्ये किती महत्त्वाचे असतात व ती जपणे आपलं एक कर्तव्य आहे हे या उदाहरणावरून लक्षात येईल.
फोटो बरोबरच काही पोस्ट आता वायरल होत आहे या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की: “एकुण काय ?? पैसे सर्वस्व नाही.. पैश्याचा जोर आणि नाचणारा मोर खूप दिवसाचा नसतो,,, केंव्हा तरी ‘ पसारा ‘ आणि ‘ पीसारा ‘ सर्व गुंडाळावा लागतो ! ! ! त्याच एकमेव उदाहरण….काल हा फोटो बघितला आणि खरं तर डोळ्यासमोरून जात नाहीये. हा जो त्रास दिसतोय चेहऱ्यावर तो नक्की कशामुळे आहे…? मुलाला होणारा त्रास बघून व्यथित झालेला बाप ? मातीत मिळालेली अब्रू …? नियतीपुढे झालेली स्वतःच्या मजोरीपणाची हार…?? की पैश्याचा माज आणि आपण किती पुढारलेले आहोत हे सांगताना केलेला माज…??
हा फोटो बघितला करावे ….त्याला हवं ते करावं….
एकूण काय आपल्या मुलाला हवं ते मिळावं अशी या मगरूर आणि माजोरी, पैश्याचा माज आणि घमंड असलेल्या बापाची इच्छा…
पण आपल्या मुलांनी सुखी रहाव असं वाटतं असेल तर नक्कीच त्यांना बाप म्हणून योग्य मार्ग दाखवणं किती महत्त्वाचं आहे हे आता सात स्वर्ग पार केले आहेत असे वाटणाऱ्या बापाला समजले पाहिजे.पैसा आणि प्रसिद्धी वलय म्हणजे सर्व नाही आयुष्यात. नीतिमूल्ये जपणे किती महत्त्वाचे आहे …….
सध्या या वायरल पोस्ट ने अनेक पालकांचे मात्र डोळे उघडले असतील हे मात्र नक्की..👍