नातेपुते(ता- ११) चंद्रप्रभू एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मेडीयम स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाने “प्रि- स्कूलर फाउंडेशन कोर्स” सूरू केला आहे. या कोर्ससाठी बनवण्यात आलेल्या डिजीटल ॲक्टिविटी क्लासरूमचे उद्घघाटन सुप्रसिद्ध शैक्षणिक सल्लागार आणि बालमानसोपचार तज्ञ डॉ. संगिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन नरेंद्र गांधी, सेक्रेटरी विरेंद्र दावडा, खजिनदार संजय गांधी, संचालक महावीर मेहता, डॉ. उदयकुमार दोशी, अर्चना गांधी मुख्यध्यापिका शितल ढोपे सह आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व पालकांसाठी “विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि पालकांचे कर्तव्य” याविषयावर डॉ. संगिता पाटील यांचे मार्गदर्शनपर पालक शिबिर घेण्यात आले. यावेळी बोलतांना डॉ. पाटील यांनी निर्णय प्रक्रियेत मुलांना सामावून घेवून त्यांची शाळा बदलताना त्यांच्याशी विचार विनिमय केला पाहिजे. असा सल्ला डॉ. पाटील यांनी पालकांना दिला. पुढे बोलताना त्यांनी पालकांनी मुलांशी जास्त गप्पा मारल्या पाहिजेत. त्यांना समजून घेवून त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे. मुलांपेक्षा घरातील कोणतीही वस्तू किंमती नाही हे सांगून त्यांनी जपानी बालसंस्कृतीची उदाहरणे दिली. यावेळेस काही पालकांनी मुलांच्या संगोपनाविषयी समस्ये संदर्भात प्रश्न विचारले असता यावर डॉ. पाटील यांनी समाधानकारक उपाय सुचवले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात, चेअरमन नरेंद्र गांधी यांनी चंद्रप्रभू स्कूल हे नेहमी आदर्श शैक्षणीक उपक्रम राबवत असून विद्यार्थ्यांन बरोबर पालक उपयोगी शिबिर घेवून सामाजिक उपक्रमात ही स्कूल अग्रेसर असल्याचे त्यांनी म्हटले.
सदर कार्यक्रमात पूर्व विभागातील मुलांनी विविध फनी ॲक्टिविटीची प्रात्यक्षिके दाखवली. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक हजर होते विशेष करून महिला पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यध्यापिका शितल ढोपे यांनी केले तर सूत्रसंचालन राजेंद्र पिसे आणि आभार प्रदर्शन संजय वलेकर यांनी मांडले.