इंदापूर शिक्षक पतसंस्थेची 100 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
काल इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेचे वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणगौरव समारंभ कार्यक्रम कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सभागृहामध्ये पार पडला.गुणगौरव समारंभाला आमदार दत्तामामा भरणे यांच्या शुभहस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रदीपदादा गारटकर अध्यक्ष जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व विशेष अतिथी म्हणून डॉ शरद जनार्दन जावडेकर यांची उपस्थिती लाभली होती.शताब्दी वार्षिक सर्वसाधारण सभेचे वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजे यावर्षी देण्यात आलेला सर्वात उच्चांकी म्हणजेच 11 टक्के लाभांश देण्यात आला.यावेळी तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे यांनी संचालक मंडळ कोणतेही मानधन न घेता किंवा कोणत्याही आर्थिक लाभ न घेता करत असलेल्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले. सोसायटीचा कारभार करत असताना सभासद हित समोर ठेवून नेहमीच निर्णय घ्यावेत अशा सूचनाही दिल्या. एकंदरीत सर्व कारभाराबद्दल मनापासून सर्वांचे अभिनंदन केले. दहा टक्के व्याजदर पिडीसीसी बँकेकडून कर्ज घेऊन, सभासदांना नऊ टक्के व्याजदराने कर्ज वाटप केले व उच्चांक 11% ने लाभांश वाटप केला हे गणित फक्त शिक्षक पतसंस्थेतील संचालक मंडळाला जमू शकते असे गौरवोद्गार भरणे मामा यांनी काढले.वार्षिक सर्वसाधारण सभेचा लेखाजोखा मांडताना चेअरमन दत्तात्रय ठोंबरे यांनी सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये सर्व संचालक मंडळांनी केलेल्या पारदर्शक कारभारामुळे संस्थेच्या इतिहासातील सर्वात उच्चांकी लाभांश 11% व भोजन भत्ता 1100 रुपये देण्यात आला असे सांगितले. पुढे ते म्हणाले की,”संस्थेच्या इतिहासात प्रथमच जून महिण्यात सभेचे आयोजन केले…कारभारात काटकसर व बचतीचे धोरण स्वीकारले. सत्कार व चहापान खर्च स्वतः मी केला. व 16 मासिक मीटिंगमध्ये संचालकांनी मासिक मिटिंग भत्ता घेतला नाही. सचिव, सहसचिव यांनी मानधन घेतले नाही. व गेली अकरा वर्ष असणारे थकित गाळे डिपॉझिट यावर्षी 100% वसूल करण्यात आले व याचाच परिणाम म्हणून सभासदांना 11 टक्के लाभांश देता आला.” पुढे ते म्हणाले की,”वेळोवेळी इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तामामा भरणे यांचेही मार्गदर्शन लाभले व त्याचबरोबर पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर यांनीही वेळोवेळी मदत केल्याचे यावेळी सभापतींनी आपल्या भाषणात नमूद केले.येणाऱ्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारच राजकारण न आणता पारदर्शक व सभासद हितासाठी निर्णय घेतले जातील असेही स्पष्ट केले.यानंतर संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयांना सचिव अंबादास नरुटे सुरुवात करून सभेमध्ये सर्व विषय सर्वांच्या उपस्थितीत बहुमताने मंजूर करण्यात आले. काही विषयांवर साधक बाधक चर्चेनंतर सभा संपन्न झाली.तसेच इंदापूर तालुका प्रा. शिक्षक संघाचे अध्यक्ष नानासाहेब नरुटे, इब्टा संघटनेचे तालुका अध्यक्ष मंगेश शेंडे, कास्ट्राईब संघटनेचे तालुका अध्यक्ष सुहास मोरे, शिक्षक भारती संघटनेचे तालुका अध्यक्ष सतिश शिंदे, शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील) गटाचे तालुका अध्यक्ष अनिल आप्पा रूपनवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे यावेळी सर्व बहुसंख्य सभासद बंधु-भगिनी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे उपसभापती सतिश गावडे व सचिव श्री. अंबादास नरुटे, सहसचिव श्री. वासुदेव पालवे, सहसचिव श्री. सचिन वारे उपस्थित होते. व संचालक बालाजी कलवले यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
Home Uncategorized पारदर्शक कारभारामुळे प्राथमिक शिक्षकांची ही पतसंस्था सर्व पतसंस्थांना दिशादर्शक ठरेल- आमदार दत्तात्रय...