पाटसमध्ये भीषण अपघातात चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू.

पाटस येथे काल एक भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये आई ,बाप व चिमुकला मुलगा असे कुटुंब उद्धवस्त झाले आहे. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने आज दुपारी बारा वाजता ही घटना घडली आहे.दौंड तालुक्यातील पाटस येथे पाटस ते कुसेगाव जाणाऱ्या रोडवर कारखान्याजवळ ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला व यामध्ये एकाच कुटुंबातील तिघाजणांचा मृत्यू झाला. संतोष सदाशिव साबळे, (वय 39), रोहिणी संतोष साबळे, मुलगा गुरू संतोष साबळे ( वय 5) रा. पाटस ता.दौड जि. पुणे अशी त्यांची नावे आहेत. या घटनेने पाटस मधील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावरती अत्यंसंस्कार राहत्या घरी काल रात्री 9 वाजता झाला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here