पाटस गावातील व पाटसच्या आजूबाजू गावातील वीस किलोमीटरच्या अंतरावरील वरवंड , कानगाव, कुसेगाव, रोटी , वासुंदे, कुरकुंभ, बिरोबावाडी, अशी गावे टोलमुक्ती व्हावी यासाठी धरणे आंदोलने करण्यात आले आहे. टोलनाक्यावरती रोज वाहनांना त्रास होतो स्थानिक लोकांना पास असले तरी टॅग मधून पैसे कट होतात , पिण्यांच्या पाण्यांची सोय नाही , आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही, अशा विविध समस्यांबाबत मागण्या करण्यात आलेल्या आहेत यामध्ये पाटस गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . वसंत साळुंखे ,संभाजी देशमुख , विठ्ठल आव्हाड, दादा भंडलकर , संजय शिंदे.असे विविध गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . टोल नाक्याचे अधिकारी सिंग साहेब यांनी त्यांच्या प्रश्नाला उत्तरे दिली आम्हांला तुम्ही 7 दिवसाची मुदत द्या आम्ही सर्व तुमच्या मागण्या पूर्ण करू असे त्यांना सांगण्यात आले यामध्ये पाटस पोलीस स्टेशनचे पीएसआय केशव वाबळे ,यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार साहेब हेही उपस्थित होते यामध्ये तालुक्याचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात हेही आंदोलनास भेट देऊन गेले त्यानंतर दौंड तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल यांनी फोनवर आंदोलनास पाठिंबा दिला, यानंतर भाषणे करण्यात आली मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढील8 दिवसांत जास्त प्रमाणात लोक जनसमूदाय आणून आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकर्यांने टोल प्रशासनाला देण्यात आला.
Home Uncategorized पाटसच्या आजूबाजूची गावे टोलमुक्ती व्हावी यासाठी धरणे आंदोलन. टोल प्रशासनाने मागितला ७...