पळसदेव येथे 06 वर्षाच्या आतील बालकांची तपासणी सम्पन्न.वैदयकीय अधिकारी डॉ. ईशा बंगेरा व त्यांच्या सहकारी कविता कांबळे यांचे बहुमोल सहकार्य.

पळसदेव(प्रतिनिधी:सूरज काळे): पळसदेव येथील शिंदेवस्ती वरील अंगणवाडीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र पळसदेव येथील वैदयकीय अधिकारी डॉ. ईशा बंगेरा व त्यांच्या सहकारी कविता कांबळे यांनी वस्तीवरील ०६ वर्षाच्या आतील सर्व बालकांची तपासणी काळजीपूर्वक केली व ज्या मुलांना औषधांची गरज आहे त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्र पळसदेव याठिकाणी भेट द्यावी व माता-पालकांना मुलांना होणारे आजार व मुलांची आजारापासुन कशी मुक्तता करायची व घरात स्वच्छतेचे वातावरण कसे ठेवायचे व अंगणवाडी सेविकां कशाप्रकारे काम करतात याची माहीती घेतली व त्यांना स्वच्छतेविषयी व आरोग्याविषयी डॉ.बंगेरा मॅडम यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी श्री.सभाष बनसुडे सदस्य ग्रामपंचायत पळसदेव हे उपस्थित होते. त्यावेळी डॉ. बंगेरा मॅडम यांनी सुभाष बनसुडे,विशाल बनसुडे यांनी कोरोनाच्या काळांत स्वताच्या जिवाची पर्वा न करता माळवाडीतील/त्यांच्या वॉर्डातील कोरोना ग्रस्त रुग्णांना सहकार्य केले त्यांना घरच्यांनी दवाखान्यात नेण्याचे टाळले ते काम या तरुण ग्रामपंचायत सदस्यांनी केले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले व आपले कर्तव्यं आहे म्हणुन नाही तर सामाजिकतेच्या भावनेतुन काम करा असे सांगितले
सदर कार्यक्रमास पळसदेव ग्रामपंचायत सदस्य सुभाष बनसुडे अंगणवाडी सेविका वैशाली बनसुडे, अर्चना बनसुडे व माता-पालक उपस्थित होते त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष बनसुडे यांनी सांगितले कि आमचे मार्गदर्शक श्री.हनुमंत नाना बनसुडे माजी जिल्हा परिषद सदस्य व विदयमान सदस्य ग्रामपंचायत पळसदेव यांच्या सहकार्याने आम्ही वाढत्या कोरोना काळांत माळेवाडी/शिंदेवस्ती येथे प्रभावी लसीकरण केले त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र पळसदेव येथील डॉक्टर व कर्मचारी यांनी सहकार्य केले व आज डॉ.बंगेरा मॅडम यांनी लहान मुलांची आपुलकीने व सहानभुतीपुर्वक तपासणी करत असल्याचे पाहिले व त्यानी सगळ्यांची आपुलकिने विचारणा केली आहे त्यामुळे सुभाष बनसुडे यांनी डॉ.ईशा बंगेरा व त्याचे आभार मानले

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here