पळसदेव (काळेवाडी:2) ता.इंदापुर गावचा द ग्रेट खली- ‘फकीर भंडारी’ ठरला लुश बेल्ड चा मानकरी.

इंदापूर:एखाद्या खेळाची आवड असेल आणि आपली आर्थिक परिस्थिती बेताची असेल तरीही खेळावरील प्रेम व निष्ठा त्याला त्याच्या विजयापासून रोखू शकत नाही असाच काही प्रत्यय समोर आला आहे. पळसदेव “द ग्रेट खली’ यांच्या लूकमधील पळसदेवच्या काळेवाडीतील फकीर भंडारी यांनी शनिवारी (दि. 16) जितू चौधरी विरुद्ध झालेल्या लढतीत विजय मिळवून लुशचा बेल्ट मानकरी झाला. भंडारी हा मूळचा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्‍यातील सुरलेगावच रहिवासी. त्याची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे.त्याची आई-वडील पळसदेव (काळेवाडी नं. 2) येथे मासेमारी व्यवसाय करून मुलाला शिकवत आहेत.परिस्थिती बेताची असतानाही मुलाला या खेळाची आवड असल्याने कधीतरी मुलगा आपलं नाव कमवेल या आपेक्षेने आई-वडील काबाडकष्ट करत आहेत.2020 मध्ये फकीर भंडारी हा पंजाबमधील जालिंदर जिल्ह्यातील कंगनीऑल येथिल द ग्रेट खली यांच्या अकॅडमीमध्ये 2 वर्षांपासून सराव करीत आहे. त्याने दिनांक 16 रोजी सी डब्ल्यू इ या रेसमध्ये भाग घेऊन जितू चौधरी याच्याशी फाइट झाली. फाइट चालू असताना चौधरीने भंडारे यांच्या डोक्‍यात खुर्ची मारल्यानंतर भंडारी हे रक्तबंबाळ झाले होते; मात्र अशा परिस्थितीत फकिरने स्वतःला सावरून त्याने तीच खुर्ची चौधरी यांच्या डोक्‍यात मारल्यानंतर रेफ्रिने (अंपायर) तीन वेळ कोटिंग केली तरी तो न उठल्याने फकीर भंडारीला विजयी घोषित केले. “लुश’चा साधारण 30 ते 35 लाख रुपये किंमत असलेला बेल्ट त्याला विजय झाल्यानंतर देण्यात आला. यावेळी पंच म्हणून राज कुंज्रा यांनी काम पाहिले तर द ग्रेट खली यांनी त्याचे अभिनंदन केले. फकीर भंडारीच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे आहे त्यातच एका ग्रामीण भागातील आणि परिस्थिती बेताची असताना मिळवलेल्या विजयामुळे समाजामध्ये एक आदर्श उदाहरण त्याच्या रूपात समोर आले आहे त्यामुळे आता ग्रामीण भागातील खेळाडू कोणत्या खेळात कमी नाहीत असाही संदेश जनमानसात पोहोचला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here