इंदापूर: शरीर ,मन आणि श्वासाला एकत्रीतपणे जोडणारा व्यायाम म्हणजे सुर्यनमस्कार.सदृढ आणि निरोगी जीवन जगायचे असेल तर प्रत्येकाने सुर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायम नियमितपणे केला पाहिजे.असे प्रतिपादन पतंजलि योग समितीचे योगशिक्षक प्रशांत गिड्डे यांनी आय काॅलेमध्ये आयोजीत शिबीरामध्ये व्यक्त केले.शनिवारी रथसप्तमी म्हणजे जागतिक सूर्यनमस्कार दिवस होता सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संकल्प दिवस इंदापूर पतंजली योग समितीच्या वतीने पहाटेच्या योग वर्गामध्ये आणि आय कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सामूहिक सूर्यनमस्कारातून राष्ट्रवंदना करीत स्वस्थ आणि निरोगी भारतासाठी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करण्यात आला.युवा भारत च्या वतीने आयोजित कला आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर प्रियदर्शनी आणि राधिका माध्यमिक विद्यालय इंदापूर येथे विद्यार्थ्यांचे सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावेळी मंत्रोच्चारासह श्वास आणि उच्छवासाचे शास्त्रोक्त पद्धतीने मार्गदर्शनही करण्यात आले. विद्यार्थ्यांना निरोगी निरामय आरोग्यासाठी योगासने प्राणायाम याचेही मार्गदर्शन करण्यात आले.
विविध ठिकाणी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी भारत स्वाभिमान प्रभारी जयकुमार शिंदे किसान प्रभारी चंद्रकांत देवकर, काशिनाथ पारेकर, मल्हारी घाडगे, रविंद्र परबत, सचिन पवार, मंगेश घाडगे, ओंकार दोंड,शरद झोळ, भालचंद्र भोसले, सायराभाभी आतार, जयश्रीताई खबाले उपस्थित होत्या.सुर्यनमस्काराचे या योगाभ्यासामुळे आपल्या शरीराची लवचिकता वाढते आणि आपला शारीरिक,मानसिक बौध्दिक विकास होतो. शरीरात कार्य करणार्या रक्ताभिण संस्था पचनसंस्था,श्वसनसंस्था आणि अस्थिसंस्था निरोगी ठेवण्याबरोबरच विविध ग्रंथीचे नियमनही व्यवस्थितपणे केले जाते.