पक्षविरोधी विधान करणारे राष्ट्रवादीचे गटनेते यांच्यावर कारवाई का नाही? आरोपात तथ्य की आपल्याच पक्षातून बड्या नेत्याचा सपोर्ट ??

इंदापूर : गेल्या 4 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नगरपालिका गटनेते गजानन गवळी यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या खात्यांच्या कारभारावर गंभीर आरोप करत सलग दोन स्फोटक वक्तव्य करून तालुकामध्ये खळबळ माजवली होती.
सदरची वक्तव्य करताना उच्चन्यायालयाच्या आदेशाचा ही संदर्भ जोडण्यात आलेला होता. हा संदर्भ जोडत तालुक्यातील ठराविक मोठ्या ठेकेदारांना चौकटीच्या बाहेर नियमबाह्य कामकाज करून पाठीशी घालत असल्याने लहान- लहान कॉन्ट्रॅक्टदार यांच्यावर उपासमारीची वेळ राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांच्या खात्याने म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभागाने आणल्याचा गंभीर आरोप गटनेते गजानन गवळी यांनी केला होता.
या गंभीर स्वरूपाच्या आरोपांची चर्चा होत असतानाच दुसऱ्या दिवशी ही आणखी एक स्फोटक वक्तव्य करताना गटनेते गजानन गवळी यांनी असे म्हटले होते की, इंदापूर नगरपालिकेमधील कर्मचाऱ्यांच्या कामांबाबत राज्यातील सामान्य प्रशासन विभाग वेळकाढूपणा करत असून जाणीवपूर्वक त्यांची कामे खडवली जात आहेत आणि योगायोगाने हे खाते सुद्धा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडेच आहे. या दोन्ही दिवसात वेगवेगळी वक्तव्य करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ माजली होती आणि अप्रत्यक्षरित्या हे वक्तव्य राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व त्यांच्या खात्यावर होती म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष त्यांच्याच पक्षात असलेले गटनेते गजानन गवळी यांच्यावर पक्षविरोधी विधान केल्याबद्दल कारवाई होईल असे वाटत असताना अद्यापही 4 दिवस उलटूनही यावर राष्ट्रवादीच्या कोणतेही बड्या नेत्याने याबद्दल प्रतिक्रिया दिलेली नाही.त्याचप्रमाणे दर शनिवार/ रविवार पत्रकारांच्या घोळक्यात असणारे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे या शनिवारी आणि रविवारी मात्र पत्रकारांना न सांगताच इंदापूर शहर दौरा केला.पत्रकारांना टाळाटाळ करण्याचे कारण ‘गजानन गवळी प्रकरण’आहे का? अशी चर्चा चालू आहे.
एवढे मोठे महाभारत घडूनही जर गटनेते गजानन गवळी यांच्यावर काहीच कारवाई होत नसेल तर गजानन गवळी यांना त्यांच्याच पक्षातुन एखाद्या मोठ्या नेत्याचा पाठिंबा आहे की काय? किंवा त्यांनी केलेले आरोप खरे आहेत का ? याचीच शंका इंदापूरकरांना पडली आहे. गजानन गवळी काय बोलले होते पहा पुढील लिंक वर👉 https://youtu.be/rTt0w-ZR6GY

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here