जिद्द आणि चिकाटीने गुणवत्ता कायम ठेवत स्वतःचे ब्रँड निर्माण करणारा ‘पकाचा चहा’चे मालक प्रकाश खांबसवाडकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या व्यवसायाची यशोगाथा..

पहाटे ५.३० वाजल्यापासून संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत तब्बल २३ वर्ष अविरतपणे १४/१४ तास अपार कष्ट करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्वतःचे अस्तित्व आणि स्वतःचा ब्रँड तयार करणारा प्रकाश खांबसवाडकर (पकाचा चहा) चे मालक याचा आज वाढदिवस. महाराष्ट्रातील मराठी तरुणांसाठी अतिशय प्रेरणादायी असा हा युवक. आज थोडक्यात त्याची यशोगाथा मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न..चहा व्यवसायाची सुरुवात 1993 साली शिवशंभो टी स्टॉल’ या नावाने झाली. सुरुवातीला आई-वडिलांनी चालू केलेला हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालला होता . त्यावेळेसही चव आणि गुणवत्तेला महत्त्व दिल्याने तालुक्यातील लोकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला होता. पहा व्हिडिओ👉 .https://youtu.be/Z3e6U6dWoV0
प्रकाशचे आई वडील हे दोघेच हा ‘शिवशंभो टी स्टॉल’ चालवत होते आणि ग्राहकांच्या पसंतीमुळे व वाढत्या प्रतिसादामुळे त्यांना तेथे एखाद्या व्यक्तीची कामाला मदत आवश्यक होती. परंतु पैसे वाचवण्याच्या हेतूने आई-वडिलांनी पंधरा पंधरा तास काबाडकष्ट केले.१९९३ ते १९९९ या कालावधीत सलग ६ वर्ष आई वडिलांनी मिळून हा व्यवसाय उत्तम पद्धतीने उभारला.त्यानंतरच्या १९९९ ते २००६ या काळात ग्राहकांचा आणखी प्रतिसाद वाढला व नाईलाजाने प्रकाशने स्वतःचे शिक्षण सोडून आई वडिलांच्या व्यवसायाला हातभार लावण्याचे ठरवले. या ६ वर्षाच्या काळात व्यवसायात असलेल्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टीचे त्याने निरीक्षण करून त्याचे आकलन केले.कालांतराने प्रकाशचे आई-वडील आता वृद्धावस्थेत असल्याने 2006 नंतर त्याने स्वतः या व्यवसायाची जबाबदारी स्वीकारून आई-वडिलांना विश्रांती देण्याचे ठरवले. आई-वडिलांकडून मिळालेल्या अनेक बारीक सारीक गोष्टीचे बाळकडू त्याने आत्मसात केले होते. त्यामुळे 2006 नंतरच्या काळात व्यवसायात खूप मोठ्या प्रमाणात बदल करून व्यवसाय आणखी जोमाने वाढवला. त्यातच त्याला त्याच्या आईने “गुणवत्ता टिकून स्वतःचा ब्रँड निर्माण कर” असा सल्ला वजा मागणी केली. त्यामुळेच अनेक बदलही व्यवसायात केले. यात उत्तम प्रकारचे दूध, चांगल्या प्रकारची चहा पावडर व विनम्र सेवा करत तब्बल १४/१४ तास काम करत त्याने व्यवसायात कमालीची प्रगती केली.परंतु २०१६ नंतर इंदापूर शहरात महाराष्ट्रात नावाजलेले अनेक चहाचे ब्रँड असलेले व्यवसाय स्थापन झाले व पकाच्या चहाची खरी कसोटी चालू झाली. परंतु आईने दिलेल्या सल्ल्यानुसार उत्तम गुणवत्ता व विनम्र सेवा देत अनेक मोठ्या मोठ्या ब्रँडला सुद्धा शह देत ”पकाचा चहा’ हाच उत्तम ब्रँड आहे. हे त्याने त्याच्या कर्तुत्वाने सिद्ध करून दाखवले.२०१७ ला प्रकाशचे पितृछत्र हरपले व प्रकाशचा मोठा आधारच संपला. त्यातही स्वतःला सावरत त्याने सध्या चहाच्या व्यवसायाबरोबरच चहा पावडरचाही व्यवसाय चालू केला आहे. पकाचा चहा नावाच्या चहा पावडरलाही आता उत्तम प्रतिसाद मिळत असून यातही तो यशस्वी होणार यात शंका नाही.सध्या काळात पकाचा चहा याठिकाणी चहाची उत्तम चव घेता-घेता इंदापूर तालुक्यातील अनेक राजकीय, सामाजिक, आर्थिक, कारखानदारी, कृषी, क्रीडा, न्यायालयीन अशा अनेक गोष्टींच्या चर्चेला उधाण येत असते.अशा या प्रकाशमुळे महाराष्ट्रातील तमाम तरुणांना जिद्द,चिकाटी व काबाड कष्ट याचे एक उत्तम उदाहरण पहायला मिळाले आहे. आईने दिलेल्या गुरूमंत्रानुसार जिद्द चिकाटी व गुणवत्तेमुळे आज त्याच्या व्यवसायाची भरभराट झाली आहे व या भरभराटीमुळे त्याच्या आईचे असलेले ‘स्वतःचे ब्रँड’ निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आज प्रकाशच्या वाढदिवसानिमित्त आपणा सर्वांकडून प्रकाशला खूप खूप शुभेच्छा देऊ व त्याची व्यवसायाची प्रगती अखंडितपणे चालू राहो याच सदिच्छा देऊया.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here