माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुभम पाडुळे यांच्या कुटूंबाची घेतली भेट
इंदापूर : प्रतिनिधी :कालठण नं. 2 ता. इंदापूर येथील शुभम संदीप पाडुळे हे वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन येथे गेले होते. रशिया युद्धामध्ये ते त्या देशात अडकले होते. शुभम पाडुळे सुरक्षित आपल्या घरी आले. आज राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कालठण नं. 2 येथे जाऊन डॉ. शुभम यांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले. यावेळी छोटेखानी झालेल्या समारंभामध्ये डॉ. शुभम पाडुळे यांनी आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मदतीमुळे त्यांनी दिलेल्या धीरामुळे, सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी केलेल्या सहकार्यामुळे, पाठपुराव्यामुळे मी मायदेशी सुरक्षित आलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी देखील आज सकाळी शुभम पाडुळे यांची त्यांच्या घरी भेट घेतली.
हर्षवर्धन पाटील यांनी पत्रव्यवहार, फोन संपर्कच्या माध्यमातून परराष्ट्र मंत्रालय तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाशी संपर्क साधून शुभम मायदेशी सुरक्षित येण्यासाठी प्रयत्न केले. ते सतत शुभम यांच्या संपर्कात होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गंगा ऑपरेशन अंतर्गत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्यासाठी सर्वोच्च प्रयत्न झाले. या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी देखील यशस्वी प्रयत्न केले जातील.
शुभम पाडुळे म्हणाले की,’ तेथील परिस्थितीमुळे आम्ही भयभीत झालो होतो मात्र मोदी साहेब आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिलेला धीर, सहकार्य, आई-वडिलांचे आशीर्वाद यामुळे आम्ही भारतात सुखरूप व सुरक्षित पोहोचू शकलो.
यावेळी अंकुश पाडुळे, बळीकाका बोंगाणे, नामदेव रेडके, राजेंद्र चव्हाण, संतोष चव्हाण, पृथ्वीराज जगताप, सुभाष बोंगाणे, राजेंद्र पवार, राघू काटे, राजेंद्र चोरमले, अतुल व्यवहारे, खबाले महाराज, ज्ञानदेव पांडुळे उपस्थित होते.