नुकतेच पुणे जिल्हा सरचिटणीस पदी इंदापूर तालुक्यातील एक युवा चेहरा म्हणून व भाजपा पक्षामध्ये सक्रियरित्या काम करणारे आकाश कांबळे यांची जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाली आहे निवड झाल्यानंतर जनता एक्सप्रेस मराठी न्यूज शी बोलताना ते म्हणाले की,”खर तर भारतीय जनता पार्टीने एका खेड्या गावातील तरुणाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील माझ्यातील धडपड ओळखून मला युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदाची जबाबदारी दिली हि जबाबदारी पार पाडत असताना गेल्या 2 टर्म मध्ये या पदाला साजेसे काम करण्याची संधी मला मिळाली. या कार्यकाळात कधीच पक्षाने दिलेल्या जबाबदारीतून बाहेर पडलो नाही तदनंतर पक्षाने मला कोल्हापूर जिल्याच्या युवा मोर्चा प्राभारी पदाची जबाबदारी दिली. तेथे ही मी प्रवास करून पक्ष संघटन वाढीकरिता प्रयत्न केले. देवेंद्रजींच्या मनातील असणारी संकल्पना म्हणजेच युवा वरियार्स याचा ही मी पश्चिम महाराष्ट्र संयोजक म्हणून काम करीत असताना समाधान होतेच. युवा वॉरियर्स यामध्ये युवकाचा मोठा मेळावा देखील बारामती या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मला घेण्याचे भाग्य मिळाले.पंढरपूर पोटनिवणुक, कोल्हापूर पोटनिवडणूक, गोवा विधानसभा या ठिकाणचा निवडणूक प्रक्रियेत माझा निवासी सक्रिय सहभाग होता. पक्षसंघटनेत कधीच कोणत्याच कामात चालढकल केली नाही आणि त्याचच फलित म्हणून पक्षाने माझ्यावरती भारतीय जनता पार्टी पुणे ग्रामिणच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी संघटनेने माझ्यावरती सोपवली आहे. नक्कीच या नवीन जबाबदारी मध्ये तुसभरही कमी पडणार नाही असा विश्वास मी माझ्या नेत्यांना देतो.खर तर आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहेब, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, आदरणीय मुरली (अण्णा) मोहोळ, आदरणीय राजेशजी पांडे, आदरणीय रामजी सातपुते, आदरणीय रवीजी अनासपुरे, आदरणीय मकरंदजी देशपांडे आपण दाखवलेला विश्वास नक्कीच मी सार्थ ठरवेल. आणि माझा पुर्ण वेळ मी पक्ष संघटना मजबूत करण्याकरिता देईल. विशेष म्हणजे मा.मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब व भाजपा जिल्हाध्यक्ष आदरणीय वासुदेव नाना काळे यांनी एवढी मोठी जबाबदारी देत जो विश्वास माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीवर दाखवला त्याला नक्कीच मी पुर्ण ताकदीने न्याय देण्याचा प्रयत्न करील व संपूर्ण जिल्ह्यात पक्षाचे काम जोमाने वाढवण्यात माझा मनापासून हातभार लावील…!!आत्ता पर्यंतच्या प्रवासात खूप हितचिंतक, मार्गदर्शक, मला भेटले. आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे ही संधी मला मिळाली असे मी समजतो तरी सर्व सहकाऱ्यांबद्दल कृज्ञता व्यक्त करतो.”अशाप्रकारे सरचिटणीस पदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच आकाश कांबळे यांनी आपली भावना व्यक्त केली.