नेहरू युवा मंडळाच्या वतीने प्रदीपराव पाटील कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित.

अतुल भालेराव : उपसंपादक

टेंभूर्णी प्रतिनिधी: वडोली तालुका माढा येथे नेहरू युवा मंडळ सोलापूर संचलित माढा तालुक्याचे अध्यक्ष तानाजी गाडेपाटील यांच्या हस्ते कोरोना काळात सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात पुढे असणाऱ्या प्रदीपराव पाटील यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले. नेहरू युवा मंडळ जिल्हा सोलापूर संचलित नेहरू युवा मंडळ माढा तालुका अध्यक्ष श्री तानाजी गाडे पाटील यांच्या हस्ते पाटील यांना पुरस्कार देण्यात आला.

सन्मानपत्र,सन्मानचिन्ह व कॅप हे पुरस्काराचे स्वरूप होते गेले दीड वर्ष झाले कोरोणा काळात प्रदीपराव पाटील यांनी जिवाची पर्वा न करता समाजामध्ये चांगल्याप्रकारे सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रात काम केल्याबद्दल त्यांचा सन्मान करून त्यांना गौरवने हे नेहरू युवा मंडळाचे कर्तव्य असल्याचे माढा तालुका अध्यक्ष तानाजी गाडे पाटील यांनी सांगितले.

यावेळी उपस्थितांमध्ये तानाजी गाडे पाटील,डॉ शिल्पा खराडे,आरोग्य सेविका अपर्णा चव्हाण,केंद्रप्रमुख समीर काळे, मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक प्रदीपराव पाटील, मुख्याध्यापक संजय कुंभार, पोलीस पाटील धनाजी काळे, ग्रामसेवक सोनवणे,सरपंच अतुल चव्हाण,शंकर सुरवसे,ग्रा.पं सदस्य गणेश खरतडे,सुभाष लोकरे,शिवाजी जाधव, बाळासाहेब बागाव, संजय कांबळे,सतीश कांबळे,पोपट थोरात,दत्तात्रय माने,अनिल भाग्यवंत, धनाजी भागावर, विक्रम मोरे,सौ पुष्पा काळे,आशा वर्कर मोरे मॅडम इत्यादी उपस्थित होते.



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here