नूतन वर्ष इंदापूर तालुक्यातील , संपूर्ण राज्यातील सर्व जनतेला सुख समृद्धीचे जावो- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

इंदापूर तालुक्यातील व महाराष्ट्रातल्या जनतेला हे नूतन वर्ष सुख-समृद्धीचे जावो अशा शुभेच्छा राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या.
2022 हे वर्ष संपून नवीन 2023 हे वर्ष सुरु होणार असून या संपूर्ण वर्षांमध्ये इंदापूर तालुक्यातील व राज्यातील सर्व जनतेचे कल्याण होण्याबरोबरच त्यांच्या सुख समृद्धीच्या, आरोग्यादायी जिवनाच्या, प्रगतीच्या भरभराटीच्या शुभेच्छा माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या.
सर्व शेतकरी, कामगार, व्यापारी ,नोकरदार,व्यावसायिक, महिला भगिनी , युवक आणि युवती यांना हे नवीन वर्ष समृद्धीचे सुखाचे जावो अशी देखील प्रार्थना यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली. त्याचप्रमाणे युवा नेते राजवर्धन पाटील यांनीही सर्व जनतेस येणारे वर्ष आरोग्यमय व समृद्धीचे जावो या शुभेच्छा दिल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here