राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) महिला तालुकाध्यक्षा पदी छायाताई पडसळकर तर इंदापूर शहराची धुरा रेश्माताई शेख यांच्याकडे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा 2007 पासून अखंडितपणे हाती घेऊन घराघरात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार प्रसार करणाऱ्या व राष्ट्रवादीच्या विश्वासू कार्यकर्त्या म्हणून ओळख असणाऱ्या छायाताई पडसळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा पदी निवड करण्यात आली आहे.आज खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते त्यांना पत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2007 पासून 2018 पर्यंत त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकारणीची विविध पदे भूषवली आहेत व 2018 ला इंदापूर तालुक्याच्या त्या महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा बनल्या होत्या. 2018 पासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापर्यंत त्याच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या धुरा सांभाळत होत्या परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी झाल्यानंतर शरद पवार साहेबांच्या गटाच्या पुन्हा एकदा त्या तालुकाध्यक्षा बनल्या आहेत. त्याचबरोबर इंदापूर महिला शहराध्यक्षा पदाची धुरा ही रेश्मा शेख यांच्या खांद्यावर सोपवली आहे. रेश्मा शेख या गेल्या अकरा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत.त्याचबरोबर महिला दक्षता कमिटीच्या त्या सक्रिय सदस्य आहेत. इंदापूर शहरामध्ये वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात त्या अग्रेसर असतात. समाजातील तळागाळातील व गरजू लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून त्या मदत करण्याचा प्रयत्न करत असतात.तालुकाध्यक्षा पदाची निवड झाल्यानंतर पडसळकर म्हणाल्या,”गेल्या अनेक वर्ष मी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत असून पक्ष वाढवण्याचे काम मी केले आहे. यापुढेही खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विश्वासास मी पात्र राहील. त्याचबरोबर नूतन शहराध्यक्षा रेश्मा शेख यांचेही काम चांगले असून मला खात्री आहे शहरामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत होईल” .त्यामुळे आता इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची बांधणी ही इंदापूर शहरापासून ते गावागावात मजबूत होण्याची शक्यता आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here