👉 – मांजरी बु.येथे पुरस्कार वितरण सोहळा
👉 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शरद पवार यांचे हस्ते पुरस्कार प्रदान
इंदापूर : प्रतिनिधी दि.21/1/23
शहाजीनगर (ता. इंदापूर ) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यास मांजरी बुद्रुक, पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) चा गळीत हंगाम सन 2021-22 चा मध्य विभागातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व्हीएसआयचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे हस्ते शनिवारी (दि. 21) प्रदान करण्यात आला. सदरचा पुरस्कार कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे व संचालक मंडळाने स्वीकारला.
मांजरी बुद्रुक येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुरस्कार वितरण समारंभ उत्साही वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये नीरा भीमा कारखान्यास ट्रॉफी, सन्मानपत्र देऊन प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू-पाटील, मार्गदर्शक शिवाजीराव देशमुख आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. निरा भिमा करण्यास सदर पुरस्कार मिळालेबद्दल कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी मजूर, वाहतूकदार, मुकादम, अधिकारी, कर्मचारी, कारखान्याचे हितचिंतक यांचे अभिनंदन केले. नीरा-भीमा कारखान्यास आजपर्यंत राज्य व देशपातळीवरील एकूण 12 पुरस्कार मिळाले आहेत, अशी माहिती यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी दिली. याप्रसंगी कारखान्याचे संचालक विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार, कार्यकारी संचालक राम पाटील, अधिकारी उपस्थित होते.
बेलवाडी ग्रामपंचायत कडून उद्या विविध विकास कामाच्या उद्घाटनाची बातमी वाचा पुढील लिंक वर क्लिक करून https://janataexpressmarathinews.com/निवडणुकीनंतर-प्रथमच-ग्रा/