नीरा भीमा कारखान्याने पार केला 5 लाख मे. टन ऊस गाळपाचा टप्पा – हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिनंदन
इंदापूर: शहाजीनगर ( ता. इंदापूर ) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन 2021-22 च्या गळीत हंगामामध्ये 5 लाख मे. टन ऊस गाळपाचा महत्वाचा टप्पा रविवारी ( दि.13 फेब्रु.) पार केला, अशी माहीती कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी रविवारी ( दि.13) दिली.
कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री वहर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याचा चालू गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालू आहे. कारखान्याने ऊस गाळपाचा 5 लाख मे. टनाचा महत्वाचा पल्ला पार केलेबद्दल कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतकांचे अभिनंदन केले आहे.
नीरा भीमा कारखान्याचे सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आदी उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प पुर्ण क्षमतेने उत्कृष्टपणे चालु आहेत. चालु वर्षी शेतकऱ्यांच्या सर्व ऊसाचे गाळप केले जाईल, एकाही शेतकऱ्याचा ऊस गळपाअभावी शिल्लक राहणार नाही. त्यामुळे ऊस तोडी बाबत शेतकऱ्यांनी घाई न करता संयम बाळगावा. चालू गळीत हंगामामध्ये 7 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना पार करेल, असेही यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी सांगितले. यावेळी संचालक विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अँड. कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार, प्र. कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील व अधिकारी उपस्थित होते.