नीरा भीमा कारखान्याचा रु. 2500 प्लस दर- माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची घोषणा..

संतोष तावरे : इंदापूर ता.प्रतिनिधी
इंदापूर: प्रतिनिधी दि.23/10/21
शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून चालु सन 2021-22 या गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रति टन रु. 2500 प्लस दर देण्यात येईल, अशी घोषणा कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी शनिवारी (दि.23) शहाजीनगर येथे केली.
आज कारखान्याच्या संचालक मंडळाची ऊस दरासंदर्भात बैठक हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीनंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रु. 2500 पेक्षा अधिकचा दर दिला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
चालु हंगामात कारखाना 7 लाख मे. टन ऊसाचे गाळप करणार आहे. तर इथेनॉलचे 1 कोटी 60 लाख लि., सेंद्रिय बॅग 2 लाख निर्मिती, 15 लाख घनमीटर बायोगॅस निर्मितीचे आणि सहवीज निर्मिती प्रकल्पातून 4 कोटी 50 लाख युनिट वीज एक्सपोर्टचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाची देय रक्कम दिवाळीपूर्वी अदा केली जाईल. तसेच कामगारांना 8.33 टक्के बोनस देण्यात येईल, असे हर्षवर्धन पाटील व लालासाहेब पवार यांनी सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जामदार, कार्यकारी संचालक डी.एन.मरकड उपस्थित होते.



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here