निवडणुकीनंतर प्रथमच ग्रामपंचायत बेलवाडी अंतर्गत विविध विकास कामाचे उद्या भूमिपूजन व उद्घाटने.

इंदापूर तालुक्यात राजकीय दृष्ट्या अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या बेलवाडी ग्रामपंचायतीवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीने झेंडा रोवत सत्ता मिळवली होती.अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीनंतर गावात प्रथमच विविध विकास कामाचे उद्घाटने व भूमिपूजने होणार आहेत.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवाडी गावच्या नूतन सरपंच मयुरीताई शरद जामदार यांच्या शुभहस्ते या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन होणार आहे.
ग्रामपंचायत बेलवाडीने जिल्हा नियोजन समितीकडे काही विकास प्रस्ताव दाखल केले होते त्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून या मिळालेल्या मंजुरीच्या कामाचे उद्घाटन उद्या होणार आहे.
गावातील वाडी वस्तीवर पिण्याचे पाणी मिळण्याच्या दृष्टिकोनातून मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केंद्र सरकारची हर घर जल योजना 3.56 कोटी रु लवकरच सुरू होत असून बेलवाडी गावाला स्वछ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे, या योजनेचेही उद्या उद्घाटन सरपंच मयुरीताई जामदार यांच्या हस्ते होणार आहे. या गावाला मिळाल्यानंतर या योजनेचेही उद्घाटन सरपंच मयुरीताई जामदार यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपाचे तालुका अध्यक्ष ॲड शरद जामदार असणार आहेत तर प्रमुख उपस्थितीमध्ये दूधगंगाचे माजी चेअरमन शहाजी शिंदे, माजी सरपंच अर्जुन जामदार, माजी बापूराव पवार, अमर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सर्जेराव काळे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल जाचक, कुंडलिक जाधव, छगन जामदार, पोलीस पाटील अरविंद जाधव, ग्रामपंचायत मा सदस्य शिवलाल भोसले, विजय पवार, माजी सरपंच लक्ष्मण खैरे, सामाजिक कार्यकर्ते संजय पवार, प्रकाश जामदार, सुभाष जामदार, शशिकांत जामदार, तानाजी मुळीक, हनुमंत जामदार,अक्षय मचाले, मोहन जामदार, प्रताप जामदार, विनायक जामदार, किसन शिंदे, शिवलाल भोसले महादेव इथापे, अंकुश घाडगे, रामचंद्र पवार, भालचंद्र मुळीक, तुलसीदास शिर्के, अर्जुन जाधव, आप्पासो तनपुरे,ज्योतीराम माने, इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी या निवडणुकीनंतर प्रथमच आयोजित केलेल्या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत सदस्य स्वाती जामदार अंबिका यादव अनिल खैरे सुप्रिया गायकवाड प्रताप पवार व युवा नेते ज्योतीराम जामदार यांनी केले आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here