इंदापूर: इंदापूर तालुक्यात माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांनी लक्ष घातल्यापासून पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत होताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यापासून वारंवार इंदापूर तालुक्यातील दौरे करून लोकांची संपर्क साधून तसेच इंदापूर तालुक्यातील लोकांच्या गरजा ओळखून काम करताना शिवसेना दिसत आहे.
आज राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले व एकेकाळी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते म्हणून समजले जाणारे वसंतराव आरडे यांची संघटनात्मक गुण ओळखून शिवसेनेने त्यांना पुणे जिल्ह्याचे प्रवक्ते पदी निवड केली आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वसंतराव आरडे यांच्या अनुभवाची दखल घेऊन जिल्हाप्रमुख यांना पुणे जिल्हा प्रवक्ते पदे नेमण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज बारामती येथे जिल्हाप्रमुख सुरेंद्र देवरे यांनी वसंतराव आरडे यांना जिल्हा प्रवक्ते पदी निवड झाल्याचे पत्र दिले त्याचबरोबर शिवसेनेचे युवानेते अवधूत पाटील यांना इंदापूर तालुका सोशल मीडिया प्रमुखपदी निवडपत्र देऊ केले.वसंतराव आरडे हे गेल्या २५ वर्षापासून गोरगरीब व मागासवर्गीय जनतेचे प्रश्न सोडवण्याबाबत काम करत आहेत. पूर्वी त्यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांनी त्यांची पुणे जिल्हासरचिटणीस पदी निवड केली होती, त्यानंतर काही कारणाने त्यांनी राष्ट्रवादी सोडली होती. आपल्या निवडीच्या प्रक्रियेनंतर नवनियुक्त जिल्हा प्रवक्ते वसंतराव आरडे म्हणाले की,”मी येणाऱ्या काळात पुणे जिल्ह्यात शिवसेना घरोघरी पोहोचवण्याचे काम करीन व माजी राज्यमंत्री शिवतारे बापू यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करेन”आता वसंतराव आरडे यांचा प्रदीर्घ अनुभव आणि पक्षाकडून मिळणारी साथ यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना मजबूत होण्याचे चिन्ह सध्या तरी दिसत आहे. दरम्यान वसंतराव आरडे व अवधूत पाटील यांच्या नियुक्ती बद्दल शिवसेना नेते विजय बापू शिवतारे यांनी त्यांचे फोन द्वारे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर इंदापूर तालुका प्रमुख महारुद्र पाटील व शहर प्रमुख अशोक देवकर यांनीही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
Home Uncategorized शिवसेनेच्या पुणे जिल्हा प्रवक्ते पदी वसंतराव आरडे यांची नियुक्ती, वसंतराव आरडे यांच्या...