इंदापूर:बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या तसेचतब्बल 100 वर्षाची सहकाराची उज्वल परंपरा असणाऱ्या निर निमगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी युवा नेते रणजीत दत्तात्रेय घोगरे व व्हा.चेअरमनपदी आबा दादा जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.नुकतीच या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते दत्तात्रेय घोगरे यांच्या विरोधात गावातील तगडे पॅनल उभा करून आव्हान देण्यात आले होते परंतु दत्तात्रय घोगरे यांनी हे आव्हान मोडून काढत तब्बल २०० मतांच्या फरकाने संपूर्ण पॅनल एकतर्फी निवडून आणून निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रताप पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला होता.
दरम्यान आज चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली,यामध्ये रणजीत घोगरे व आबा जाधव यांचे अनुक्रमे चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे जाहीर केले.चेअरमन पदी निवड झालेले रणजीत दत्तात्रय घोगरे हे उच्च विद्याविभूषित असून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी तसेच एमबीए पर्यंतचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.या निमित्ताने माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बिनविरोध निवडीबद्दल चेअरमन-व्हा.चेअरमन तसेच इतर पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या…
यावेळी बोलताना नवनिर्वाचित चेअरमन रणजित घोगरे यांनी सांगितले की,मा.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच ज्येष्ठ नेते दत्ताजी घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने आज माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे,ती मी प्रामाणिकपणे पार असून संस्थेच्या सर्व सभासदांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.तसेच आगामी काळामध्ये सोसायटीच्या सर्व सन्माननीय संचालक मंडळाच्या सहकार्याने संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी मेहनत घेणार आहे.