उपसंपादक-निलकंठ भोंग
इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द (पत्रे वस्ती) येथे निरा डावा कालव्याला मोठे भगदाड पडून लाखो लिटर पाणी वाया जाऊन यामध्ये शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसह शेततळ्यांचे तसेच शेजारी असणाऱ्या विहिरींचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी दि.१५ जुलै रोजी सायं ६ वाजण्याच्या दरम्यान वरकुटे खुर्द पत्रेवस्ती या ठिकाणी निरा डावा कालव्याचा एक भरावा अचानक खचल्याने त्यातून लाखो लिटर पाणी वाया जाऊन शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कळताच माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निरा डावा कालवा येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत प्रशासनाला पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे कालवा मोठ्या प्रमाणात खचून वाहून जाणारे पाणी थेट शेतकऱ्यांच्या ढोबळी ,मका, केळी, ऊस, डाळिंब आधी पिकांमध्ये गेले असून शेततळ्याचे मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच सलग चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने नुकसान झाले होते. त्यात कालवा फुटल्याने आणखी भर पडून मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले की सदरचा कालवा हा ब्रिटिशकालीन असल्याने अनेक ठिकाणी तो नादुरुस्त झालेला आहे. त्याचे लाइनिंग चे काम लवकरच चालू होणार आहे. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून लवकरात लवकर काम सुरू करण्याच्या सूचना राज्यमंत्री भरणे यांनी दिल्या.
पावसामुळे कालवा पूर्ण क्षमतेने वाहत असल्याने. वरकुटे खुर्द हद्दीत कालव्याला भगदाड पडले असून, याबाबत जलसंपदा विभागाकडून कालव्याला पडलेले भगदाड बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, नगरसेवक पोपट शिंदे, वरकुटे खुर्दचे सरपंच बापूराव शेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home Uncategorized निरा डाव्या कालव्याला पडलेल्या भगदाडाची माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी,दुरुस्तीबाबत...