निमसाखर येथे बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त अभिवादन

निमसाखर ता.इंदापूर येथे दिनांक 23 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका संघटक सुदर्शन रणवरे, ग्रामपंचायत सदस्य गोरख शेळके, ग्रामपंचायत सदस्य शेखर पानसरे, क्लार्क विशाल रणवरे, शिपाई विजय खुडे, महेश पाटोळे आदी उपस्थित होते.
तसेच सायंकाळी ऊसतोड मजूरांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका संघटक सुदर्शन रणवरे, उपविभागप्रमुख तुषार दळवी, शाखाप्रमुख युवराज अडसूळ, अभिजित रणवरे, प्रवीण रणवरे, आकाश वाघ उपस्थित होते.
सदर उपक्रमाचे आयोजन शिवसेना निमसाखर शाखा यांच्यावतीने करण्यात आले होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here