निमगाव विदयामंदिर मध्ये विद्यार्थ्यांचे वह्या पुस्तके गुलाबपुष्प देऊन स्वागत….

निमगाव केतकी: कोरोनामुळे गेल्या दीड वर्षा पासून शाळा बंद होत्या त्या महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन सॅनिटायझर मास्क याचा वापर केला होता. विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेच्या प्रवेशद्वारात रांगोळी काढून पुष्पवृस्टी करण्यात आली. आर्य वैश्य कमेटी व प्रितम फाउंडेशनच्या वतीने वह्या, पुस्तक ,पेन पेन्सिल व सर्व साहित्यांचे गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तालुक्यातील इंनपायर पारितोषिक व शिष्यवृत्ती आशिष घुगे याला मिळाल्या बद्दल प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.या वेळी जवाहर शिक्षण प्रसारक मंङळाचे अध्यक्ष श्रीनिवास इनामदार, मुख्याध्यापक रामचंद्र आसबे, हनुमंत पवार, सावणे मॅङम, सुश्रुषा इनामदार, सुरवसे सर, प्रा सचिन मगर, रामचंद्र मगर सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आभार धनाजीराव जाधव यांनी मानले..



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here