“ताई हे आमच्यासाठी बर नव्हं”…निमगाव केतकी येथील आंदोलक शेतकऱ्यांच्या भावना. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली का घोरनिराशा ? वाचा सविस्तरच.

गेल्या महिन्यात बोरी (इंदापूर) येथे निमगाव केतकी बाह्यवळण संदर्भात पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घेऊन तोडगा काढणार असे आश्वासन देणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आंदोलक शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे का? असाच प्रश्न आता समोर येत आहे. कारण नेहमीच सोशल मीडियावर अग्रेसर असणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी गेल्या आठवड्यात आपल्या फेसबुक पेजवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग व इतर ठिकाणच्या अडीअडचणी संदर्भात एक निवेदन दिले आहे या निवेदनात प्रत्येक तालुक्याचा तालुकानिहाय प्रश्न मांडले असून इंदापूर तालुक्याचा रियालाईनमेंट प्रश्न मात्र मांडला नसल्याचे समोर येत आहे.निमगाव केतकीतील संभाव्य बाह्यवळणाला विरोध करीत निमगाव केतकी येथील शेतकऱ्यांनी काही महिन्यापूर्वी तब्बल 108 दिवसाचे आंदोलन केले होते.प्रदीर्घ काळानंतर प्रशासनाच्या मध्यस्थीने सदरचे आंदोलन थांबवण्यात आले होते.परंतु दरम्यानच्या काळात प्रशासनाकडून कोणत्याही सकारात्मक घडामोडी न घडल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आंदोलनाचे अस्त्र निवडून 7 दिवस अन्नत्याग केला होता व यातूनच सहा आंदोलकांची तब्येत खालावली होती.अखेर पुन्हा एकदा प्रशासनाच्या मध्यस्थीने वस्तुनिष्ठ अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केल्यानंतर या आंदोलकांनी आपले उपोषण मागे घेतले होते. या सर्व घडामोडीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती कारण गेल्या महिन्यात आंदोलक शेतकरी यांच्याशी बोरी तालुका इंदापूर येथील एका कार्यक्रमात भेटून पालखी महामार्ग हा केंद्राचा विषय असल्याने नितीन गडकरीच ठोस निर्णय घेऊ शकतात म्हणून सुप्रिया सुळे यांनी आंदोलक शेतकरी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात बैठक पुढील आठवड्यात लावणार असे आश्वासित केले होते व त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत होऊन संभाव्य रिअलाईनमेन्ट रद्द होईल याच अपेक्षेत निमगाव केतकीतील शेतकरी वर्ग करत होता.शेतकऱ्यांच्या रियालयीन्मेंट प्रश्नसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे आश्वासन देऊन एक महिना उलटला तरीही याबाबत कोणत्याही घडामोडी घडलेल्या पहावयास मिळाल्या नव्हत्या परंतु आता स्वतः खासदार सुप्रियाताई सुळे यांनी फेसबुकद्वारे दिलेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील बाह्यवळण प्रश्न संदर्भात आपल्या निवेदनात ‘ब्र‘ शब्द न काढल्यामुळे निमगाव केतकी येथील आंदोलक शेतकरी यांची घोर निराशा होऊन आपली पुन्हा फसवणूक झाली की काय? असाच प्रश्न आता त्यांना पडला आहे.सुप्रियाताई सुळे यांनी केलेली फेसबुक वरची पोस्ट वाचा https://www.facebook.com/100044093303263/posts/pfbid02jcGjC9mM1quW1JEeBPDrrSzyBwWfoxnWQ1ryv2qv6t1pMzKikLHVv4Zdvh3DWCGXl/?mibextid=cr9u03

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here