शिवसेनेचे (बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते तथा माजी मंत्री विजय बापू शिवतारे उद्या निमगाव येथील आंदोलक शेतकऱ्यांची संवाद साधणार- शिवसेना नूतन शहराध्यक्ष अशोकभाऊ देवकर.

संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग बाह्यवळण प्रश्नावर गेल्या अनेक दिवसापासून संघर्ष करत असणाऱ्या शेतकऱ्यांना शिवसेनेचे प्रवक्ते विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याकरिता लवकरच विजयबापू शिवतारे शेतकऱ्यांची भेट घडवून आणून देणार असल्याचे नूतन शिवसेना शहराध्यक्ष अशोक भाऊ देवकर यांनी आज शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. अशोक भाऊ देवकर यांनी माहिती दिल्यानुसार उद्या दुपारनंतर शिवतारे बापू शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याकरिता येणार असल्याची माहिती अशोक भाऊ यांनी दिली आहे. उद्या शिवतारे बापू यांच्याबरोबर शिवसेनेची तोफ भाऊसाहेब आंधळकर सुद्धा येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह निर्माण झाला आहे.
शेतकरी त्यांच्या मागणीवर ठाम असून गेल्यावेळी तब्बल 108 दिवस उपोषण केल्यानंतर प्रशासनाच्या मध्यस्थीने चालू आंदोलन मागे घेऊन आत्मदहन करण्यापासून शेतकऱ्यांना प्रवृत्त केले होते परंतु त्यानंतर कित्येक महिने उलटून गेल्यानंतरही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने पुन्हा एकदा शेतकरी अन्नत्याग करण्याचे अस्त्र वापरले आहे. यातूनच चार शेतकऱ्यांची तब्येत खालवल्यामुळे तालुक्यामध्ये खळबळ निर्माण झाली होती.
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम हे केंद्रशासित असल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून हे काम सुटणार असून यात फक्त भारतीय जनता पार्टीच मार्ग काढू शकते हे ओळखून शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष अशोक भाऊ देवकर यांनी भाऊसाहेब आंधळकर यांच्या माध्यमातून विजयबापू शिवतारे यांना शेतकऱ्यांची सुसंवाद साधण्यासाठी लवकरच निमगाव येथे आणणार असल्याचे अशोक देवकर यांनी यावेळी सांगितले. शिवसेना बाळासाहेब गटाच्या इंदापूर तालुक्यातील निवडीनंतर निमगाव केतकीतील शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या विषयांमध्ये हस्तक्षेप केल्याने शेतकऱ्यांना सुद्धा आता न्याय मिळण्याची अपेक्षा वाढू लागली आहे उद्या शिवतारे बापू यांच्याबरोबर काही महत्त्वाची पदाधिकारी सुद्धा येणार असून इंदापूर तालुक्यातील ही नूतन निवड झालेले पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे दुर्गा शिंदे यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here