उपसंपादक: निलकंठ भोंग
निमगाव केतकी येथील राऊतवाडी या ठिकाणी श्रावणातल्या पहिल्या सोमवारचे अवचित्य साधून नव्याने बांधलेल्या महादेव मंदिराच्या पिंड प्राणप्रतिष्ठापना तसेच कलशरोहणाचा कार्यक्रम पार पडला. निमगाव केतकी येथील कचरनाथ सेवा मंडळाच्या वतीने या मंदिराची स्थापना करण्यात आली असून उत्तर प्रदेश येथील उज्जैन या ठिकाणहून ही पिंड मागवण्यात आली.पुणे जिल्हा व परिसरातील सर्वात मोठी महादेवाची ही पिंड आहे. निमगाव केतकी पंचक्रोशीतील अनेक नागरिकांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती.या पिंड प्राणप्रतिष्ठापनेच्या पूजेचा पहिला मान निमगाव केतकीचे माजी उपसरपंच तुषार (बाबा) जाधव व त्यांच्या पत्नी सोनाली जाधव यांना मिळाला. या पूजेसाठी अमृत महाराज खराडे कर्जत तसेच कलशरोहणासाठी चैतन्य महाराज गोसावी दहिवडी यांनी हजेरी लावली. पूजेनंतर भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.भविष्यात कचरनाथ सेवा मंडळ एक जागरूक देवस्थान म्हणून नावारूपास येईल अशी आशा येथे आलेल्या भाविकांनी व्यक्त केली.
Home Uncategorized निमगाव केतकी येथे पिंड प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न.तुषार (बाबा) जाधव यांना मिळाला पूजेचा...