निमगाव केतकी: ग्रामीण भागातील महिलांसह युवती,वृद्ध महिलांनी विविध स्पर्धेत सहभाग घेण्याच्या उद्देशाने तसेच निमगाव केतकी येथील सांस्कृतिक वैभवात भर घालण्यासाठी तुषार (बाबा ) जाधव मित्र परिवारातर्फे (दि.२२ मार्च) गुढीपाडव्या निमित्त क्रांतीनाना माळेगावकर सिने अभिनेता,होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी आतापर्यंत एक हजार महिलांनी नाव नोंदणी केल्याचे कार्यक्रमाच्या आयोजिक तुषार(बाबा )देवराज जाधव व सोनाली तूषार जाधव यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी सिने अभिनेते क्रांतीनाना माळेगावकर व बाल कलाकार, गायक सह्याद्री माळेगावकर हे सूत्रसंचालन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत .
विजेत्या महिलांना प्रथम बक्षीस सोन्याचा नेकलेस (१ तोळा), सोन्याची नथ, तसेच मानाची पैठणी, द्वितीय बक्षीस ४३ इंची स्मार्ट टिव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस वॉशिंग मशिन, पाचवे बक्षीस पिण्याच्या पाण्याचा फिल्टर, सहावे बक्षीस स्मार्टफोन, सातवे बक्षीस आटा चक्की, आठवी बक्षीस कुलर, नववे बक्षीस मिक्सर, दहावी बक्षीस गॅस शेगडी, अकरावी बक्षीस टेबल फॅन याच्यासह विविध गृह उपयोगी वस्तूंचे बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी गावातील तसेच परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन देवराज पतसंस्थेच्या चेअरमन सोनाली जाधव तसेच सिद्धिविनायक पतसंस्थेचे चेअरमन तुषार (बाबा) जाधव यांनी केले आहे.