इंदापूर तालुका प्रतिनिधी: सचिन शिंदे
निमगाव केतकी गावचे युवा नेते माजी उपसरपंच तुषार जाधव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.सकाळी महालक्ष्मी मंदिर परिसरात सुशोभीकरणासाठी शोभिवंत वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर निमगाव केतकी येथील मराठी शाळा तसेच अंगणवाडी विद्यार्थ्यांना वही पेन वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.सिद्धिविनायक पतसंस्थेचे संचालक प्रशांत बंडगर त्याचे मार्फत निमगाव केतकी येथील ग्रामपंचायत महिला सफाई कामगार यांना साडी वाटप करण्यात आले.निमगाव केतकी येथील कौठीमळा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये निमगाव केतकी च्या कौठीमळा येथील ॲड. सुभाष भोंग यांच्या तर्फे तुषार जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या व गोष्टीची पुस्तके वाटून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
जाधव कुटुंबीयांकडून यापूर्वीही बरेच समाजोपयोगी उपक्रम राबवले गेले आहेत कोरणा काळात देखील त्यांनी गरजवंतांना किराण्याचे २००० किट वाटप केले होते. आपला वाढदिवस हा सर्वसामान्य, गरजवंतांना उपयोगी असला पाहिजे असे जाधव यांचे मत आहे. जाधव कुटुंबीय हे अडीअडचणीत सापडलेल्या लोकांच्या पाठीशी नेहमीच उभे राहते.निमगाव केतकी येथील अनेक युवकांनी संस्थानी तसेच शाळेतील शिक्षकांनी देखील तुषार जाधव यांचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी पंचायत समिती सदस्य देवराव जाधव, शशिकांत तरंगे, मा. उपसरपंच तात्यासाहेब वडापुरे, तालुका अध्यक्ष बाबासाहेब भोंग, ग्रामपंचायत सदस्य दादाराम शेंडे, प्रशांत बंडगर, ॲड सुभाष भोंग, ॲड सचिन राऊत,अमोल राऊत, राजकुमार जठार, शंकर मिसाळ, मारुती भोंग, विठ्ठल राजगुरू, विनोद चकोर, वैभव मोरे, नंदकुमार गोरे, बाळासो शेंडे, बापू फुटाणे, हनुमंत जाधव, अष्टविनायक पतसंस्था, सिद्धिविनायक पतसंस्था, मयुरेश्वर पतसंस्था त्यांचे सर्व संचालक कर्मचारी आदी उपस्थित होते.