निमगाव केतकी या ठिकाणी १×५ एम.व्ही. ए. क्षमतेचे नवीन रोहित्र बसवण्यात यावे – अमोल राऊत

इंदापूर ता.प्रतिनिधी: सचिन शिंदे
मोजे निमगाव केतकी येथे ३३/११ के.वी. उपकेंद्र असून त्या ठिकाणी एकूण(८) ११के.वी. फिटर असून त्यापैकी ६ फिटर शेतीपंप व १ फीडर गावठाण व १ फिटर इंडस्ट्रीज आहे मागील ४ वर्षापासून उपकेंद्र मधील शेतीपंपाचे ६ ही फिडर पूर्णपणे ओव्हरलोड झाले आहेत. जानेवारी महिन्यापासून पाऊस पडेपर्यंत एकूण ६ ते ७ महिने सर्व शेतीपंप फिटरचे सिंगल फेज सप्लाय पूर्णपणे बंद ठेवावे लागत आहे. त्या एकूण ६ ते ७ महिन्यांमध्ये पूर्णपणे उन्हाळा असल्यामुळे ग्राहकांना विद्युत पुरवठा बंद राहिल्यामुळे उकाड्याचा खूप त्रास होत आहे. त्याचबरोबर ४ वर्षांपूर्वी झगडेवाडी येथे १× ५ क्षमतेचे नवीन १ उपकेंद्र मंजूर झाले आहे. परंतु त्याचे आजपर्यंत काम झाले नाही. तसेच झगडेवाडी येथील उपकेंद्राचे काम झाल्यास फक्त १ शेतीपंपाच्या ६ फिटर पैकी ३ फिटर वरील लोड कमी होणार आहे. त्यामुळे जुन्या उपकेंद्रांमध्ये असून १×५ एम. व्ही. ए. क्षमतेचे नवीन रोहितेची गरज आहे. त्यानंतर एकूण ६ फिटर वरील लोड पूर्णपणे कमी होईल. निमगाव केतकी गावाचा परिसर खूप मोठा आहे. तसेच गावाच्या पूर्ण परिसरातून निरा डावा कालवा असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये उपकेंद्रातील ओव्हरलोड पूर्णपणे वाढत आहे. निमगाव केतकी उपकेंद्रावरील व्याहाळी, कौठळी, वरकुठे खुर्द, पिटकेश्वर, कचरवाडी, इंदापूर फिटर निमगाव केतकी गावठाण या ठिकाणचे असणारी लोकसंख्या त्यामुळे निमगाव केतकी उपकेंद्रावरती ओव्हरलोड येत आहे. हे लक्षात घेता निमगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल राऊत यांनी माजी राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे १ नवीन रोहित्र बसवण्याची मागणी केली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here