निमगाव केतकी बेमुदत धरणे आंदोलनाला तहसीलदार श्रीकांत पाटील यांची भेट.

निमगाव केतकी: संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग 965 जी निमगाव केतकी बेमुदत धरणे आंदोलनाला इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी भेट देऊन तेथील घेतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
रिअलायमेंटच्या चुकीच्या तांत्रिक बाबी वरती सविस्तर चर्चा केली यामध्ये काही चुकीचा त्रुटी जाधव गुरुजी यांनी निदर्शनास आणून या विषयावर चर्चा झाली गावाच्या विकासाच्या दृष्टीने दोन्ही बाजुनी एकत्र येऊन मार्ग काढावा यासाठी अधिकाऱ्यांसह गावातील व्यापारी ,शेतकरी यांना विचारात घेऊन मार्ग काढणार तसेच संबंधित प्रांताधिकारी प्राधिकरण अधिकारी लवकरच बैठक लावणार यावेळेस तेथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिले की कुठलाही शेतकरी कोणाच्याही विरोधात नाही.
यावेळी सर्जेराव जाधव गुरुजी, तात्यासाहेब वङापुरे, कुलदीप हेगडे,अॅङ सचिन राऊत, संदीप भोंग,सुभाष वङापुरे, रत्नाकर बरळ, दतात्रय भोंग,दिपील चिखले, अर्जुन म्हेत्रे तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here