नितीन गडकरी यांच्यामार्फत निमगाव केतकी बाह्यवळण प्रश्न हा केंद्रातून सोडवण्याचा खा.सुप्रियाताईंच्या माध्यमातून प्रयत्न करणार- आमदार दत्तात्रय भरणे.

निमगाव केतकी : संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग क्र.९६५ (जी) वरील निमगाव केतकी येथील बाह्यवळण (रिआलाईनमेंट) रद्द करण्याच्या मागणीसाठी प्राणांतिक उपोषणासाठी बसलेल्या शेतकऱ्यांच्या पाचव्या दिवशी अखेर राज्याचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
परंतु या भेटीत कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही.त्यामुळे शेतकरी आपल्या मागण्यावर ठाम आहेत.गेली पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या प्राणांतिक उपोषणाकडे तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे लक्ष घालून मार्ग काढणे गरजेचे असताना त्यांनी मात्र या ठिकाणी कोणताही निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.यावेळी बोलताना भरणे म्हणाले की, निमगाव केतकी येथील रिअलाइनमेंटचा मुद्दा हा केंद्रीय स्तरावरील असून याप्रकरणी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत..पुणे जिल्यातील पाटसपासून तोंडले-बोंडलेपर्यंत श्री संत तुकाराम महाराज महामार्ग विकसित केला जात असून १३६ किमीच्या या प्रकल्पातही रस्त्याचे चौपदरीकरण व दोन्ही बाजूंना स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आले आहेत. हा मार्ग बारामती – निमगाव केतकी – इंदापूर – अकलूज – वाखरी या गावांमधून जातो. सुरक्षिततेच्या दृष्टीने काही गावांना वळणरस्ते प्रस्तावित केले आहेत. या महामार्गासाठी भूसंपादनासह एकुण खर्च ४ हजार ४१५ कोटी रुपये अपेक्षित आहे.
दरम्यान सोमवार (दि.७) पासून प्राणांतिक उपोषणासाठी बसलेल्या ३१ आंदोलनकर्त्यांपैकी तात्यासाहेब वडापुरे, संदीप भोंग, मच्छिंद्र आदलिंग, हनुमंत बरळ, चंद्रकांत वडापुरे या ५ आंदोलकांची प्रकृती गुरुवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास अचानक बिघडल्याने त्यांना येथील सरकारी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले होते.मात्र उपचारानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन स्थळी जाऊन आंदोलन सुरू केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here