निमगाव केतकी ग्रामपंचायतीकडून गट विकास अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली ,निमगाव केतकी ग्रामपंचायतीचा गैर कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर.

इंदापूर ( प्रतिनिधी: निलेश भोंग): निमगाव केतकी येथील झालेल्या ई निविदा प्रक्रिया राबवत असताना महाराष्ट्र शासन आदेशानुसार जिओ टॅगिंग फोटो व स्थळ पाहणी दाखला ही अट टाकता येत नसतानाही निमगाव केतकी ग्रामपंचायत कडून आपल्या पदाचा गैरवापर करत काही लोकांकडून शासनाच्या नियमावलीचे उल्लंघन केलेले आहे. इंदापूरचे गट विकास अधिकारी यांनी दि.२१/०२/२०२२ रोजी ग्रामपंचायत निमगांव केतकी यांना याबाबत आदेश देऊनही या आदेशाला निमगाव केतकी ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखवली आहे.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अमोल राऊत यांनी ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराला कंटाळून दि. १४ मार्च पासून आमरण उपोषण करण्याचे निवेदन दिले आहे.या संदर्भात गट विकास अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
—————————————————————-
” निमगाव केतकी येथील ग्रामस्थ हे ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराला कंटाळलेले असून या ना त्या कारणाने गावातील लोकांना वेठीस धरण्याचे राजकारण चालले आहे.ई निविदा रद्द करण्याचे आदेश असताना देखील या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे दिनांक १४ मार्च पासून अमरण उपोषण करीत आहे.”
– अमोल राऊत
(सामाजिक कार्यकर्ते निमगाव केतकी)
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here