निमगाव केतकीत 30 तारखेला होणार शेतकर्‍यांचे सामुदायिक आत्मदहन ? प्रांताधिकारी व प्रोजेक्ट डायरेक्टर अधिकारी यांनी घेतली शेतकरी आंदोलकांची भेट.

निमगाव केतकी: संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग 965 जी च्या संदर्भात तब्बल 106 दिवस झाले धरणे आंदोलनास बसणाऱ्या शेतकऱ्यांची आज प्रांताधिकारी व महामार्ग प्रोजेक्ट डायरेक्टर अधिकारी यांनी निमगाव केतकी येथे जाऊन तेथील आंदोलन शेतकऱ्यांची भेट घेतली.यावेळी शेतकऱ्यांचे संपूर्ण म्हणणे व अडीअडचणी अधिकाऱ्यांनी समजून घेतल्या.
निमगाव केतकी येथील शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांनी 30 तारखेला सामुदायिक आत्मदहनाचा इशारा दिला होता यासंदर्भात शेतकऱ्यांनी आत्मदहन करू नये,शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे असे आवाहन प्रांताधिकारी यांनी यावेळी करण्यात आले .
या शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाच्या भूमिकेतून एक समजते शेतकरी हा कोणत्याही व्यापारीवर्गाच्या विरोधात नाही. शेतकरी हा रिलायमेंटच्या पूर्णपणे विरोधात आहे. बायपासला एक इंचही जागा देणार नाही या शेतकरी भूमिकेवर ठाम आहेत .या आंदोलनाच्या ठिकाणी इंदापूर तहसील चे अनिल ठोंबरे तसेच इंदापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी मुजावर साहेब,धनवे साहेब हे पण उपस्थित होते
यावेळी शेतकरी वर्गातून तात्यासाहेब वङापुरे, सर्जेराव जाधव गुरुजी ,अॅङ सचिन राऊत ,कुलदीप हेगडे माणिक भोंग समस्त शेतकरी वर्ग उपस्थित होता.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here