निमगाव केतकीतील आंदोलक शेतकरी हे खा.सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून नितीन गडकरींना पुढील आठवड्यात भेटण्याची शक्यता.

इंदापूर तालुक्यात बहुचर्चित निमगाव केतकी बाह्यवळण प्रश्नावर लवकरच तोडगा निघणार असण्याची शक्यता दिसून येत आहे कारण परवा बोरी (इंदापूर) येथे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आंदोलक शेतकरी यांच्याशी संवाद साधला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून या प्रश्न कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि याचकरिता पुढील आठवडयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वेळ घेऊन शेतकरी समिती यांच्या समवेत बैठक आयोजित करणार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी आंदोलक शेतकरी कमिटीला दिल्याची समजते.
पुणे जिल्यातील पाटसपासून तोंडले-बोंडलेपर्यंत श्री संत तुकाराम महाराज महामार्ग विकसित केला जात असून १३६ किमीच्या या प्रकल्पातही रस्त्याचे चौपदरीकरण व दोन्ही बाजूंना स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आले आहेत. हा मार्ग बारामती – निमगाव केतकी – इंदापूर – अकलूज – वाखरी या गावांमधून जातो. सुरक्षिततेच्या दृष्टीने काही गावांना वळणरस्ते प्रस्तावित केले आहेत. या महामार्गासाठी भूसंपादनासह एकुण खर्च ४ हजार ४१५ कोटी रुपये अपेक्षित आहे.निमगाव केतकीतील संभाव्य बाह्यवळणाला विरोध करीत निमगाव केतकी येथील शेतकऱ्यांनी काही महिन्यापूर्वी तब्बल 108 दिवसाचे आंदोलन केले होते.प्रदीर्घ काळानंतर प्रशासनाच्या मध्यस्थीने सदरचे आंदोलन थांबवण्यात आले होते.परंतु दरम्यानच्या काळात प्रशासनाकडून कोणत्याही सकारात्मक घडामोडी न घडल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आंदोलनाचे अस्त्र निवडून 7 दिवस अन्नत्याग केला होता व यातूनच सहा आंदोलकांची तब्येत खालावली होती.अखेर पुन्हा एकदा प्रशासनाच्या मध्यस्थीने वस्तुनिष्ठ अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केल्यानंतर या आंदोलकांनी आपले उपोषण मागे घेतले होते. या सर्व घडामोडीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्त्वाची ठरली कारण पालखी महामार्ग हा केंद्राचा विषय असल्याने नितीन गडकरीच ठोस निर्णय घेऊ शकतात म्हणून सुप्रिया सुळे यांनी आंदोलक शेतकरी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात बैठक पुढील आठवड्यात लावणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत होऊन संभाव्य रिअलाईनमेन्ट रद्द होईल याच अपेक्षेत निमगाव केतकीतील शेतकरी वर्ग आहे.

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here