निमगांव केतकी येथील गणेश यात्रा याहीवर्षी साध्या पद्धतीने होणार.

इंदापूर तालुका प्रतिनिधी: निलेश भोंग

निमगांव केतकी :निमगांव केतकी येथील सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने २५ व २६ डिसेंबर या दोन दिवशी गणेश याञे निमित्त फक्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्तांनी दिली.
शनिवारी सकाळी सात वाजता गणेश मंदिरात गणेशास अभिषेक दुपारी दोन वाजता भजन,रविवारी सकाळी सात वाजता गणेश याग व दुपारी बारा वाजता आरती असे नियोजन आहे.
गणेश याञे निमित्त दर वर्षी मिरवणुक, किर्तन, आॕर्केस्ट्रा व कुस्त्या हे होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने मच्छिंद्र चांदणे, दशरथ बनकर, किशोर पवार, सुर्यकांत महामुनी, भारत मोरे, वसंत घाडगे, भगवान घाडगे या विश्वस्त मंडळाने यंदा गणेश याञे निमित्त फक्त धार्मिक विधी करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेतला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here