निमगांव केतकी ग्रामीण रुग्णालय येथे जागतिक परिचारिका दिन साजरा..

निमगाव केतकी:निमगाव केतकी येथील रुग्णालयामध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला यावेळी सर्व परिचारिकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला फ्लोरेन्स नायटिन्गेल यांनी आधुनिक नर्सिंगचा पाया रचला.त्यांच्याच स्मरणार्थ त्यांच्या जन्मदिनी जगभरात १२ मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.यावेळी डॉ.अरविंद आरकिले, डॉ. प्रणाली जाधव, डॉ. रोहित जाधव, डॉ. सौरभ जाधव,डॉ. हर्षला गव्हाणे, अधिपरिचारिका शितल राऊत, तेजश्री बिचकुले, सारिका कोकणे, शेखर गणगे, जयकुमार राऊत, आप्पा राऊत, तसेच निमगांव केतकीगावातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण भोंग, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय राऊत तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here