करमाळा प्रतिनिधी – देवा कदम
करमाळा तालुक्यातील उमरड ग्रामपंचायतीत लोक शाहीर आण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.थोर समासुधारक ,लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती असून सुद्धा फक्त ग्रामपंचायतीतील २ कर्मचारी व ग्रामसेवक या तिघांनीच अण्णा भाऊ साठे यांच्या फोटोला पुष्प वाहून अभिवादन केले.उमरड गावचे सरपंच आणि ग्राम पंचायती मधला एकही सदस्य यावेळी उपस्थित नव्हते. ग्रामपंचायत म्हणजे गावाचे कामकाज ज्या ठिकाणाहून चालू होते आणि ज्यांच्या आधारावर गाव चालतो.ज्या समाज सुधारकांनी जनतेसाठी व देशासाठी आपल्या जिवाचं रान केलं त्यांच्याच जयंतीला जर गावचे सरपंच आणि सदस्यच नसतील तर ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे.
जर समाज सुधारकांच्या जयंतीला च सरपंच आणि ग्रामपंचायती चा एकही सदस्य नसेल तर इतर वेळेस तरी कसे असतील.अशीच चर्चा चालू आहे. ग्रामविकास अधिकारी भालेराव ए. डी.आणि ग्राम पंचायत चे शिपाई फत्तेखान सय्यद,नारायण कोंडलकर हे उपस्थित होते.