पाटस येथील नागेश्वर महाराज मंदिर परिसरातील मार्बल, कोटा,ग्रेनाईट फरशी याचे लोकार्पण सोहळा दौंड तालुक्याचे आरोग्य दूत आमदार राहुल दादा कुल यांच्या शुभहस्ते व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मा. आमदार मा. श्री. रमेश आप्पा थोरात यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पाटसचे ग्रामदैवत नागेश्वर महाराज मंदिर परिसरातील मार्बल, कोटा, ग्रेनाईट फरशी वापरून मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात आलेले आहे त्यांचा लोकार्पन सोहळा आज 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता ठेवण्यात आलेला होता.तानाजी केकान यांनी स्वखर्चाने मार्बल , कोटा , ग्रेनाईट फरशीचे काम केले या कामांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तात्यांच्या सर्वच योजना ह्या गावाच्या विकासासाठी सदैव तप्तरतेने लागू असतात. तात्यांना संकल्पना सुचली ती तप्तरतेने अंमलात आणली जाते व ती स्वखर्चाने पूर्ण केली जाते अशाच प्रकारे तात्यांकडून गावांच्या विकासासाठी हातभार लाभो अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.