वैभव पाटील :प्रतिनिधी: बोईसर: नांदगांव तर्फे तारापूर येथिल युवती समाजसेवेच्या वतीने नव्या वर्षाचे औचित्य साधून नांदगांव गावापासून वंचित आदिवासी भाग चैतापाडामध्ये युवतींनी स्वखुशीने लहान मुलांना शालेय दप्तर, महिलांना सॅनिटरी नॅपकिन तसेच गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले.नववर्षानिमित्त गोरगरीब जनतेसाठी या युतीने काही निधी जमा करून गोरगरीब जनतेसाठी खर्च केला आहे .त्यामुळे युवतींचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तेजस्वी घरत तसेच युवती अवनी गावड, श्वेता ठाकूर, सेजल पाटील, निधी ठाकूर, प्राची पाटील, साक्षी पाटील, वैष्णवी पाटील, मृन्मयी पाटील, यांनी लहान मुलांना व तेथील महिलांना होणाऱ्या कामांची माहिती व मार्गदर्शन केले.