वैभव पाटील :पालघर जिल्हा प्रतिनिधी
दि. 02 सप्टेंबर रोजी सफाळा पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय अमोल गवळी साहेब यांनी सफाळा परिसरातील पत्रकारांशी बुधवार दि. 02 सप्टेंबर रोजी सहविचार सभा आयोजित केली होती. या सहविचार सभेमध्ये गुन्हेगारीच वाढतंं प्रमाण, झपाटाने होणार नागरीकरण, वाहतूक कोंडी ,बाल गुन्हेगारीकरण, घरफोड्या, ऑनलाइन फसवणूक, गाड्या चोरी, मुलींची छेडछाड , अमली पदार्थांची विक्री, फेरीवाले,भाडोत्र्यांची माहिती,अशा अनेक विषयांवर चर्चा करून सेवा काळातील अनेक अनुभव सांगितले. तसेच मला माझा सफाळा सुंदर सफाळा घडवण्याची संधी प्राप्त झाली आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करा अशी साद सुद्धा घातली यावेळी जेष्ट पत्रकार लोखंडे, पत्रकार पाटील, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा पत्रकार वैभव पाटील , राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा पत्रकार जतिन कदम , पत्रकार रवींद्र घरत, विजय घरत, नवीन पाटील ,शेळके मेजर आधी यावेळी उपस्थित होते. नवनिर्वांचीत सहाय्यक पोलीस निरीक्षक गवळी साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन चांगल्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.