प्रतिनिधी. सचिन शिंदे.
शिरूर (पुणे) तालुक्यातील चिंचोली मोराची मध्ये नवज्योत ग्रामविकास फाउंडेशन माध्यमातून हळंदी कुंकुचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रम निमित्त विविध सार्वजनिक उपक्रम चे नियोजन करण्यात आले होते.वृक्षारोपण केलेली झाडांना आळ करणे, झाडाना पाणी देणे,साफसफाई शाळेच्या परिसरात अशी विविध कामे करण्यात आले.या हळंदी कुंकुच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्य परिषद सदस्य सौ.स्वातीताई दत्तात्रय पाचुंदकर पाटील व सौ.स्मिताताई शेखरदादा पाचुंदकर पाटील उपस्थित होते.चिंचोली मोराची मधील माता भगिनी यांनी बहुसंख्यने उपस्थिती दर्शविली.तसेच सौ.शितलताई उकिर्डे,सौ.आनंदी नाणेकर,सामाजिक कार्यकर्त्यां सौ.भारतीताई गणेश धुमाळ यावेळी उपस्थित होते.नवज्योत ग्रामविकास फाउंडेशन मधून अध्यक्ष सौ.अक्षताताई उकिर्डे,महिला कल्याण अध्यक्ष सौ.रूपालीताई उकिर्डे व महिला कल्याण उपाध्यक्ष सौ.छायाताई उकिर्डे यांनी हळंदी कुंकुचे आयोजन केले होते.यांनी या कार्यक्रम मधुन महिला ना आवाहन करण्यात आले की महिलानी एकञ येऊन संवाद साधून एकजूटने गावच्या विकासला हातभार लावला पाहिजे.महिला सशक्तिकरणची आवश्यकता आहे.हळंदी कुंकुच्या कार्यक्रमाने सगळे एकञ आले.अशी एकजूट दाखवली पाहिजे असे नवज्योत ग्रामविकास फाउंडेशन माध्यमातून सांगण्यात आले.
Home सामाजिक उपक्रम नवज्योत ग्रामविकास फाउंडेशन माध्यमातून सार्वजनिक उपक्रम मधुन हळंदी कुंकु कार्यक्रम संपन्न