नरेंद्र मोदी यांच्या सभेत बॉम्बस्फोट प्रकरणी 4 जणांना फाशीची शिक्षा, 8 वर्षापूर्वी नेमकं काय घडलं होतं..? वाचा सविस्तर..

बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात 8 वर्षांपूर्वी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुंकार रलीत साखळी बाम्बस्फोट झाले होते.
याप्रकरणी “एनआयए! विशेष कोर्टाने सोमवारी (1 नोव्हेंबर) 4 दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. इम्तियाज अन्सारी, हैदर अली ऊर्फ ब्लक ब्युटी, नोमान अन्सारी, मुजिबुल्ला अन्सारी अशी त्यांची नावे आहेत.या गुन्ह्यातील अन्य दोन दोषी ओमर सिद्दीकी, अझरुद्दीन यांना जन्मठेपेची शिंक्षा सुनावली, तर अहमद हुसैन, फिरोज अस्लम या दोघांना 10 वर्षांच्या कारावास, तसेच इफ्तेखार आलमला याला 7 वर्षांची शिक्षा दिली. दरम्यान, याआधी ‘एनआयए’ विशेष कोर्टाने आरोपी फारूकउद्दीन याची निर्दोष सुटका केली होती.
पाटणा येथील बेउर तुरुंगातून आज सकाळी सर्व 9 दहशतवाद्यांना एनआयए’ विशेष कोर्टात नेण्यात आले होते. त्यात हैदर अली, नुमान अन्सारी, मजीबुल्लाह, उमर सिद्धिकी, फिरोज अस्लम, इम्तियाज आलमसह 9 जणांचा समावेश होता. या खटल्यात 187 जणांचे जबाब नोंदविण्यात आले.
बॉंम्बस्फोट घडवून आणण्यासाठी 8 दहशतवादी सकाळीच बसने रांचीहून पाटण्याला आले. त्यानंतर गांधी मैदान आणिं पाटणा जंक्शन येथे साखळी बॉंम्बस्फोट झाले. त्यात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 89 जण जखमी झाले होते.

पाटणा जंक्शनच्या प्लटफार्म क्रमांक 10 च्या टायलेटमध्ये मानवी बाम्ब बनविताना झालेल्या स्फोटात एक दहशतवादी मारला गेला. पाटणा जंक्शन येथे ब्लास्टिंग करताना मोहम्मद इम्तियाज पकडला गेला. त्याच्या चौकशीत सगळा कट समोर आला.या प्रकरणी 27 ऑक्टोबर 2013 रोजी पाटणा पोलिस ठाण्यात प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर 31 ऑक्टोबर 2013 रोजी या प्रकरणाचा तपास एनआयए’कडे देण्यात आला. नंतर 1 नोव्हेंबर 2013 रोजी दिल्ली एनआयए पोलिस ठाण्यात पुन्हा तक्रार नोंदविण्यात आली.यात अल्पवयीन मुलांसह 12 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.एका आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अल्पवयीन आरोपींना बाल न्यायालयाने याआधीच तीन वर्षाची शिक्षा सुनावली होती.



Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here