धर्मवीर दिघे यांच्या जीवनाविषयी ज्यादिवशी बोलेल त्यादिवशी राज्यात मोठा भूकंप होईल- मुख्यमंत्र्यांचा इशारा

मालेगाव (जि. नाशिक) : गद्दारी कोणी केली, विश्वासघात कोणी केला, आम्ही कोणालाही पळवून नेले नाही. दिवस-रात्र मेहनत करून शिवसेना मोठी केली. आमचे आई-बाप काढू नका, धर्मवीर आनंद दिघे यांचा स्वर्गवास ही माझ्यासाठी सगळ्यात दु:खद घटना होती, धर्मवीर दिघे यांच्या जीवनाविषयी ज्यादिवशी बोलेल त्यादिवशी राज्यात मोठा भूकंप होईल, असा इशारा शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मालेगाव येथील जाहीर सभेत दिला.
शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादी व काँग्रेससोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रिपद मिळवले. मग विश्वासघात कोणी केला? बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली? मुंबई बॉम्बस्फोटाचे कनेक्शन असणाऱ्यांसोबत संबंध कोणी ठेवले? पन्नास आमदारांनी अन्यायाविरोधात बंडखोरी नाही तर उठाव, क्रांती केली आहे. याची जगातील ३३ देशांनी दखल घेतली आहे. एवढा मोठा उठाव का झाला याच्या मुळाशी जावे. आमच्यावर गद्दारीचा शिक्का मारला जात आहे. मात्र, जनतेने आम्हाला स्वीकारले असल्याचे या विराट गर्दीवरून दिसून येत आहे. आम्ही कोणाच्या विरोधात गेलो नाही. हिंदुत्व सोडलेले नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून निवडणूक लढवली होती. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचवण्यासाठी काम करीत आहोत. गेल्या अडीच वर्षांत सेनेच्या आमदारांचे अस्तित्व धोक्यात आले होते. त्यामुळेच टोकाची पावले उचलली असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.पोलिसांसमोर अनेक अडचणी आहेत. त्यांच्य जुन्या वसाहती आहेत. लिकेजेस आहेत, प्लॅस्टर पडत आहे. त्यांच्यासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करणार असल्याची घोषणाही एकनाथ शिंदे यांनी केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here