भारतीय महिला क्रिकेटच्या संदर्भातील एक खूप मोठी आणि दुःखद बातमी समोर येत आहे.तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला क्रिकेटर राजश्रीचा अखेर मिळाला मृतदेह, २६ वर्षांच्या क्रिकेटरनं जंगलात झाडावर घतेली फाशी ? काय आहे प्रकरण?
राजश्रीचा मृत्यू हा तिच्या कुटुंबीयांसाठी मोठा धक्का मानण्यात येतोय. राजश्रीचा संशयास्पद मृत्यू पाहता तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय.
महिला क्रिकेटर हिचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. जंगलात एका झाडावर फाशी घेतलेल्या अवस्थेत राजश्री स्वेनचा मृतदेह सापडलाय. ११ जानेवारीपासून राजश्री बेपत्ता होती. ओडिशाच्या कटकमधील जंगलात तिचा मृतदेह अखेरीस सापडला. राजश्रीच्या असा आकस्मित मृत्यूबाबत क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त होतेय.
तर दुसरीकडे राजश्रीच्या कुटुंबीयांनी ओडिशा क्रिकेट असोसिएसनवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात गु्न्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु करण्यात आलाय. कटकच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २६ वर्षीय राजश्रीची स्कूटी अथागढच्या गुरुदीझटीया जंगलात बेवारस अवस्थेत सापडली. जवळच असलेल्या एका झाडावर फासावर लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
👉 कोण होती राजश्री❔
राजश्री ही राईटी फास्ट बॉलर होती. तर मधल्या क्रमांकावर बॅटिंगही करीत असे. राजश्री बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कोचनी १२ जानेवारीला पोलिसांत तक्रार दाखल केली होती. राजश्री मूळची पुरी जिल्ह्यातील रहिवासी आहे.
👉 टीममध्ये संधी न मिळाल्यानं नाराज
पुड्डपचेरीत होणाऱ्या आगामी राष्ट्रीय स्तरावरील टुर्नामेंटंसाठी, प्रशिक्षण घेण्यासाठी ती कटकला आली होती. ओडिशा क्रिकेट असोसिएशननं या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं होतं. या प्रशिक्षणानंतर १६ सदस्यांच्या टीमची निवड करण्यात आली, त्यात राजश्रीला संधी मिळाली नव्हती. त्यानंतर नाराज झालेली राजश्री रडत कॅम्पमधून निघून गेली होती. त्यानंतर रात्री ती हॉटेलमधूनही बेपत्ता झाली होती.
राजश्रीचा मृत्यू हा तिच्या कुटुंबीयांसाठी मोठा धक्का मानण्यात येतोय. राजश्रीचा संशयास्पद मृत्यू पाहता तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. राजश्रीच्या मृतदेहावर मारहाणीच्या खुणा असल्याचं आणि तिच्या डोळ्यालाही जखम झाल्याचं निष्पन्न झालं आहे. राजश्रीनं चांगली कामगिरी करुनही तिचं सिलेक्शन कसं झालं नाही, असा सवालही विचारण्यात आलाय. ओडिशा क्रिकेट असोसिएशननं हे आरोप फेटाळले आहेत. पारदर्शी पर्दधतीनं टीमचं सिलेक्शन करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणंय. ही घटना दुर्देवी असल्याचं सांगत असोसिएशननं राजश्रीच्या निधनाबाबत दु:खही व्यक्त केलंय.