धक्कादायक बातमी: क्रिकेट विश्वातील जादूई गोलंदाज शेन वॉर्न यांचे दुःखद निधन

क्रिकेट विश्वाला हादरवणारी एक बातमी समोर येत आहे.ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे,प्राप्त झालेल्या माहितीनुसार शेन वॉर्न यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समजते.शेन वॉर्न यांनी आपल्या लेग स्पिन च्या जादूने अवघ्या विश्वाला फिरकी गोलंदाजी काय असते हे दाखवून दिले आहे.शेन वॉर्न यांचे चाहते फक्त ऑस्ट्रेलिया मध्येच नसून अवघ्या जगात शेन वॉर्न यांच्या बॉलिंगची स्तुती केली जाते व त्यांचे अनुकरण ही केले जाते.
क्रिकेटचा इतिहासामध्ये शेन वॉर्न यांना कोणीही विसरु शकणार नाही अशी कामगिरी शेन वॉर्न यांनी केली आहे. शेन वॉर्न यांच्या निधनाने अवघ्या जगातील सर्व प्रकारच्या खेळाडूंना धक्का बसणार आहे एवढे मात्र नक्की. अशा या महान खेळाडूला जनता एक्सप्रेेेस मराठी न्यूज च्या सर्व टिम कडून भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here