द्वितीय श्रावण सोमवार निमित्तानं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने श्री क्षेत्र भुलेश्वर येथे फराळ चिवडा वाटप

दिनांक 8 ऑगस्ट 2022 द्वितीय श्रावणी सोमवार निमित्ताने श्री क्षेत्र भुलेश्वर येथे अखिल भारतीय मराठा महासंघ,भवानीशंकर सोशल फाउंडेशन, पोलीस फ्रेंड वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने फराळ चिवडा वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितांमध्ये मराठा महासंघ क्रीडा विभाग पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शिवाजीदादा साळुंखे,पश्चिम महाराष्ट्र युवक मराठा महासंघ उपाध्यक्ष भाऊसाहेब चौधरी,पश्चिम महाराष्ट्र संघटक गोरखभाऊ कामठे, इंदापूर तालुका शेतकरी मराठा महासंघ अध्यक्ष सौदागर पाडुळे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे संयोजक आणि उपस्थिती पुणे जिल्हा युवक अध्यक्ष मयूरआबा सोळसकर, दौंड तालुका व्यापार उद्योग आघाडी अध्यक्ष सुरज चोरगे, दौंड तालुका शेतकरी मराठा महासंघ अध्यक्ष विशाल राजवडे, दौंड तालुका विद्यार्थी उपाध्यक्ष अशोक दळवी, विद्यार्थी सचिव सुरज आखाडे, विद्यार्थी कार्याध्यक्ष निखिल दौंडकर, हवेली तालुका महिला कार्याध्यक्ष निवेदिता खेडेकर, हवेली तालुका शेतकरी मराठा महासंघ उपाध्यक्ष तुषार साठे, विष्णू खेडेकर,वर्षा सातपुते, नवनाथ बोंगाणे,दादासो चोरमले इत्यादी होते.चिवडा वाटप सौजन्य – अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शाखा, विकास टेमगिरे सौदागर पाडुळे यांनी केले होते.याच संघाच्या वतीने पहिला श्रावणी सोमवारी भाविकांना तुळशी वाटप कार्यक्रम करण्यात आला होता. कार्यक्रमाचे हे 6 वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे प्रत्येक श्रावणी सोमवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे असे यावेळी युवक जिल्हाध्यक्ष मयूर सोळसकर यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here