दौड तालुक्यातील शेती आठमाही होण्याचे संकेत, पिकांचे नुकसान,पाटस येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पंचनाम्याची मागणी.

पाटस(दौंड ता.प्रतिनिधी: गणेश खारतुडे) खडकवासला धारणातून कालवामध्ये 25 दिवस गॅप दिल्याने पिकांचे नुकसान झाले असल्याने पाटस येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सोमवार (ता. २८) रोजी तहसीलदारांना भेटून मागणी निवेदना मार्फत केली आहे.
एकूण २९ टीएमसी पाण्यातील पुणे शहराला पिण्यासाठी ११.५ टीएमसी पाणी तर शेतीसाठी १८ टीएमसी पाणी शेतीसाठी राखीव करण्यात आला होते. पण सध्या खडकवासला धरणातुन पुणे शहराला18 टीएमसी पाणी राखीव केले आहे.
खडकवासला धरणातील शेतीसाठी ११.५ टीएमसी पाणी शेतीसाठी दिले जात आहे. तसेच हिवाळ्यात शेतीसाठी पाण्याची जास्त आवश्यकता नसताना पाटबंधारे विभागाकडून आवर्तन दिले जात आहे. जाणीवपूर्वक उन्हाळ्यात पाण्याची गरज असताना पाटबंधारे विभाग आवर्तन वेळेवर सोडण्यास विलंब करत आहे
१२०० क्यूसेसने पाणी कालवामध्ये सोडले जाते पण इंदापूरला २५० क्यूसेस पाणी पोचते. यामधील ९५० क्यूसेस पाण्याची गळती होत आहे. पाटबंधारे विभागाला पाण्याचे योग्य नियोजन करता येत नसल्याचे आरोप केले जात आहे.
खडकवासला पाटबंधारे विभागआणि पुणे महानगरपालिका यांचा वाढीव पाणी करार
करण्यात आला . यामध्ये ११ टीएमसी पैकी ६ टीएमसी पाणी शुद्ध करून बेबी कॅनॉल मार्फत शेतीकरिता द्यायचं होत पण आता तो करार महानगरपालिका पाळत नाही. यामुळे धरणाचे दोन आवर्तन बंद झाले असल्याने शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण होत आहे.
त्वरित नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी करत आहेत. १८ टीएमसी पाणी पिण्यासाठी धरणातून आवर्तनावरून समतोल नसल्याचे नुकसान होत आहे. दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
भाजीपाला, कांदा, ऊस, पिकांना पाणी मिळत नसल्याने पिके जळून चालली आहेत. यामुळे पाटस येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार संजय पाटील यांची भेट घेऊन नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. यावेळी पाटसचे शेतकरी आबासो पाटील, दिनेश गायकवाड, शरद कामठे, शंकर गायकवाड, संदीप खारतुडे,विजय शितोळे, लक्ष्मण हळदे, नवनाथ म्हस्के, रमेश जाधव, निखिल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here