दौंड शुगरचा साखर शेतकरी संवाद मेळावा उत्साहात संपन्न…यावर्षी भरपूर पाऊस..पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज..!

देऊळगाव राजे: (प्रतिनिधी : महेश सूर्यवंशी)- दौंड येथे दौंड शुगर प्रा. लि.आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी २०२३ साली देखील भरपूर पाऊस पडेल असा अंदाज देऊळगाव राजे येथे व्यक्त केला. ते दौंड शुगर साखर कारखाना आयोजित बदलत्या हवामानातील ऊस शेती या चर्चासत्रात भैरवनाथ मंदिरात बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे उपस्थित होते. यावेळी बोलताना डख यांनी या वर्षी पाऊस कधी पडेल, पाऊस पडण्याचे विविध संकेत कोणते असतात, अल निनो म्हणजे काय आणि त्याचा पाऊसावर काय परिणाम होतो हे शेतकऱ्यांना उधारणासह पटवून दिले, त्याच बरोबर विविध पिकाबद्दल पिक वाढीसाठी सखोल असे मार्गदर्शन केले. यामधे ऊस, कांदा, कापूस, गहु, हरभरा, सोयाबीन या विविध पिकांच्या उत्पादन वाढीसाठी छोट्या छोट्या गोष्टी शेतकऱ्यांना या वेळी सांगितल्या, गारपीट कोणत्या भागात होते आणि कधी होते हे देखील त्यांनी यावेळी सांगितले, तसेच पाऊस चालू असताना वीज कुठे पडते आणि त्यापासून शेतकऱ्यांनी आपला कसा बचाव करायचा हे देखील यावेळी सांगितले, यावेळी कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे, दौंड शुगर चे पूर्ण वेळ संचालक शहाजी गायकवाड, दौंडचे माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे, देऊळगाव राजे चे माजी सरपंच अमित गिरमकर, शेतकी अधिकारी दिपक वाघ, ऊस विकास अधिकारी संदेश बेनके,कृषी खात्याच्या भोसले मॅडम, मगर मॅडम आणि या भागात पंजाबराव डख यांचा पहिलाच कार्यक्रम असल्याने परिसरातील शेतकरी देखील मोठया संख्येने उपस्थित होते, प्रस्ताविक अमित गिरमकर यांनी केले तर आभार दीपक वाघ यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here